Astrology: या अक्षरांची नावं असलेली लोकं असतात अतिशय भाग्यवान; नशिबात असतो पैसाच पैसा!
हिंदू धर्मात जन्म झाल्याच्या बाराव्या दिवशी नामकरण विधी असतो. या विधीला सोळा संस्कारांपैकी एक मानले जाते. याशिवाय ज्योतिषशास्त्रात (Astrology) ग्रह, ताऱ्यांसोबत अंकशास्त्र आणि नावालाही महत्त्व असतं. नावातील पहिलं अक्षरही ज्योतिषशास्त्रात महत्त्वाचं असतं. प्रत्येक अक्षर कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित असतं आणि त्यावरून व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्य ठरवलं जातं. आज आपण अशाच भाग्यवान लोकांच्या नावाबद्दल जाणून […]
हिंदू धर्मात जन्म झाल्याच्या बाराव्या दिवशी नामकरण विधी असतो. या विधीला सोळा संस्कारांपैकी एक मानले जाते. याशिवाय ज्योतिषशास्त्रात (Astrology) ग्रह, ताऱ्यांसोबत अंकशास्त्र आणि नावालाही महत्त्व असतं. नावातील पहिलं अक्षरही ज्योतिषशास्त्रात महत्त्वाचं असतं. प्रत्येक अक्षर कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित असतं आणि त्यावरून व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्य ठरवलं जातं. आज आपण अशाच भाग्यवान लोकांच्या नावाबद्दल जाणून घेणार आहोत. या अक्षरावरून सुरु होणाऱ्या नावांना नशिबाची साथ मिळते. याशिवाय त्यांच्या आयुष्यात भरपूर पैसा असतो.
N अक्षर असलेले लोक आयुष्यात खूप नाव कमावतात. करिअरमध्ये भरपूर यश मिळवत पुढे जातात. हे लोक विलासी जीवन जगतात. यश मिळवण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागतो, पण ध्येय गाठेपर्यंत जिद्द सोडत नाहीत.
P अक्षरावरून नाव असलेल्या लोकांचे व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक असते त्यांचा स्वभाव अगदी साधा आणि शांत असतो. हे लोक आपल्या साध्या स्वभावामुळे कोणाचेही मन सहज जिंकतात. हे लोक आपलं काम व्यवस्थितरित्या करतात आणि यश मिळवतात.
A अक्षर असलेले लोक लहानपणापासूनच खूप प्रामाणिक असतात. स्वभावाने प्रेमळ असतात. त्यांना नशिबाची पूर्ण साथ मिळते. प्रेमात एकनिष्ठ असतात आणि त्यांचे प्रेम मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जातात. ते स्वभावाने मैत्रीपूर्ण आहेत.
D अक्षरावरून नाव असलेले लोक खूप हुशार असतात. या लोकांवर देी सरस्वतीची कृपा असते. यासोबतच देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वादही मिळतो. ते जीवनात नेहमी आनंदी असतात आणि समाधानी असतात. ते त्यांचे ध्येय गाठेपर्यंत त्यांची ऊर्जा आणि वेळ कमी लावतात.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)