Mercury Retrograde : पुढचे 20 दिवस 3 राशींचं नशीब फळफळणार; ग्रहांचा अधिपती देणार दुप्पट लाभ
Mercury Retrograde Effect On Zodiac Signs : ग्रहांचा राजकुमार समजला जाणार बुध ग्रह हा नुकताच वक्री झाला आहे. येत्या ७ एप्रिलपर्यंत बुध याच अवस्थेत राहील. ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाच्या वक्री हालचालीमुळे तीन राशींना सर्वात जास्त फायदा होण्याची शक्यता आहे.

मार्च महिना संपायला अवघे काही दिवस उरलेले आहेत. एप्रिल महिन्यात अनेक राशींसाठी शुभ फळ देणारे योग जुळून येत आहेत. एकीकडे मार्च महिना संपताच मकर राशीची साडेसाती संपत आहे. तर दुसरीकडे आणखी एक ग्रह नुकताच वक्री झालेला असल्याने त्याचा फायदा काही राशींना होणार आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत हा ग्रह वक्री चाल करत आहे. त्यामुळे तोपर्यंत 3 राशी अशा आहेत, ज्यांना पुढचे 20 दिवस शुभ परिणाम बघायला मिळणार आहेत.
ज्योतिषशास्त्रानुसार सर्व ग्रहांचा अधिपती मानला जाणारा बुध ग्रह हा सध्या वक्री चाल करत आहे. 15 मार्चपासून बुध ग्रह वक्री झालेला आहे. येत्या 7 एप्रिलपर्यंत बुध ग्रह वक्री राहणार आहे. ज्योतिषशास्त्रात बुध हा ग्रह ज्ञान, व्यवसाय, विवेक, संवाद आणि व्यापार इत्यादींचा दाता मानला जातो. त्यामुळे बुध ग्रहाची ही वक्री झालेली चाल 3 राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. पुढचे 20 दिवस या राशींना ‘नो टेंशन’ अशी परिस्थिती तयार झालेली आहे.
कोणत्या आहेत त्या 3 राशी
वृषभ
बुध ग्रहाच्या वक्री गतीचा फायदा होणारी पहिली रास वृषभ आहे. या राशीच्या लोकांच्या कामात काही समस्या येत असतील तर त्या आता कमी होतील. तसंच या राशीचे लोक लवकरच आयुष्यात एखादं उच्च स्थान प्राप्त करतील. कामाच्या ठिकाणी वातावरण तुमच्यासाठी अनुकूल असेल. जर तुम्ही परिश्रमपूर्वक काम केले तर पुढच्या महिन्यात तुम्हाला बढती मिळू शकते. व्यापाऱ्यांना त्यांचे जुने पेमेंट मिळेल ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती थोडी सुधारेल. जर घरात मालमत्तेबाबत काही वाद सुरू असेल तर या काळात तो वाद मिटण्याची शक्यता आहे. एकूणच सगळ्या कामात तुम्हाला सकारात्मक बदल घडताना दिसणार आहेत.
कर्क
७ एप्रिलपर्यंत कर्क राशीच्या लोकांना भौतिक सुखांचा आनंद मिळेल. या लोकांच्या नात्यांत गोडवा वाढेल. जोडीदारासोबत काही वाद सुरू असतील तर या काळात ते मिटतील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. जर नोकरी करणाऱ्या लोकांनी त्यांचे अनावश्यक खर्च कमी केले तर त्यांची बचत वाढेल. व्यावसायिकांच्या कुंडलीत मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे. अविवाहित लोकांना एप्रिल महिन्यापूर्वी त्यांचे खरे प्रेम मिळू शकते. आरोग्याच्या दृष्टिकोनातून, येणारा काळ वृद्धांसाठी अनुकूल असेल.
वृश्चिक
ग्रहांचा राजकुमार समजल्या जाणाऱ्या बुध ग्रहाच्या विशेष कृपेमुळे या राशीच्या व्यावसायिकांचा नफा वाढेल. जे नोकरी करतात, त्यांच्या पगारात लवकरच वाढ होऊ शकते. अविवाहित लोक त्यांच्या कुटुंबासह धार्मिक सहलीला जाण्याची योजना आखू शकतात. तुमच्या वडिलांसोबतचे तुमचे नाते अधिक घट्ट होईल आणि तुम्ही त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवाल. उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये वाढ झाल्यामुळे दुकानदारांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. वृद्धांचा मानसिक ताण कमी होईल आणि त्यांचे आरोग्य सुधारेल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)