प्रतिगामी गुरू
Image Credit source: Social Media
मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) गुरु ग्रहाला खूप महत्वाचे स्थान दिले आहे, त्याला देवगुरु असे संबोधण्यात येते. बृहस्पति हा सुख आणि सौभाग्य देणारा ग्रह आहे. पत्रिकेत गुरू शुभ स्थानी असल्यास अनेक लाभ मिळतात. जर पत्रिकेत गुरु शुभ असेल तर व्यक्ती खूप आनंदी आणि सुखी जीवन जगतो. 12 वर्षांनंतर बृहस्पति स्वराशी मीन राशीत आहे आणि आता तो उलट दिशेने जाणार आहे, म्हणजेच प्रतिगामी होणार आहे. 4 सप्टेंबर 2023 पासून गुरु ग्रह प्रतिगामी होईल. मीन राशीमध्ये गुरूची प्रतिगामी गती सर्व राशीच्या जातकांच्या जीवनावर परिणाम करेल. दुसरीकडे, गुरु 3 राशीच्या लोकांना भरपूर लाभ देईल. सप्टेंबरपासून या लोकांचे नशीब उघडू शकते, असे म्हंटल्यास चुकीचे ठरणार नाही.
राशीनुसार प्रतिगामी बृहस्पतिचा शुभ प्रभाव
- मेष- गुरूची प्रतिगामी गती सप्टेंबरपासून मेष राशीच्या लोकांना खूप लाभ देईल. या लोकांना प्रत्येक कामात शुभ परिणाम मिळतील. आर्थिक प्रगती होईल. धन लाभ होईल. थांबवलेले पैसे परत मिळतील. व्यवसाय चांगला चालेल. वैवाहिक सुखात वाढ होईल. जोडीदाराची साथ चांगली राहील. जीवनात आनंद वाढेल. पैशांची बचतही होईल यामुळे तुमचा बँक बॅलन्स वाढेल.
- मिथुन- गुरूची उलटी चाल मिथुन राशीच्या लोकांना खूप लाभ देईल. या लोकांचे उत्पन्न वाढेल. पगार वाढ मिळेल. इच्छित पद आणि पैसा मिळाल्याने आनंद होईल. अनपेक्षित लाभ मिळू शकतात. अविवाहित लोकांना जोडीदार मिळू शकतो. वैवाहिक जीवनात आनंद राहील. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल.
- कर्क- गुरूची प्रतिगामी गती कर्क राशीच्या लोकांना शुभ परिणाम देईल. तुमच्या करिअरमध्ये प्रगती होईल. व्यवसाय चांगला चालेल. बेरोजगारांना रोजगार मिळेल. नफा वाढेल. उत्पन्न वाढल्याने तुमची आर्थिक चिंता दूर होईल. तणावातून आराम मिळेल. मानसिक शांती, आनंद मिळेल. वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)