Shukra Gochar 2023 : तीन दिवसानंतर भौतिक सुखांचा कारक शुक्र करणार गोचर, या राशींना मिळणार पाठबळ

Shukra Gochar 2023 : भौतिक सुखांचा कारक असलेला शुक्र ग्रह 30 मे रोजी मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. या गोचरामुळे काही राशींना फायदा होणार आहे.

Shukra Gochar 2023 : तीन दिवसानंतर भौतिक सुखांचा कारक शुक्र करणार गोचर, या राशींना मिळणार पाठबळ
Shukra Gochar 2023 : भौतिक सुख देणाऱ्या शुक्र ग्रहाच्या गोचरामुळे तीन राशींना येणार चांगले दिवस, वाचा स्थितीबाबत
Follow us
| Updated on: May 27, 2023 | 2:38 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी बदल करत असतो. त्याचा परिणाम प्रत्येक राशींवर होत असतो. शुक्र ग्रह 30 मे 2023 रोजी रात्री 7 वाजून 39 मिनिटांनी मिथुन राशीतून चंद्राच्या कर्क राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र 2 मे 2023 पासून मिथुन राशीत होता. 28 दिवस या राशीत ठाण मांडल्यानंतर कर्क राशीत येणार आहे. या राशीत शुक्र ग्रह 38 दिवस राहील. 7 जुलै 2023 रोजी सकाळी 3 वाजून 59 मिनिटांनी कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करेल. 38 दिवस काही राशींना शुक्र ग्रहाची कृपा असणार आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या राशींवर शुभ परिणाम होईल.

शुक्र ग्रह ज्या दिवशी राशी बदल करणार आहे त्या दिवशी जेष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी आहे. या दिवशी गंगा दशमी देखील आहे. या दिवशी मकर राशीत लक्ष्मी योग तयार होणार आहे. त्यामुळे राशीचक्रावर सकारात्मक परिणाम दिसून येईल.

या राशींना होणार फायदा

मेष : या राशीच्या जातकांना शुक्र गोचराचा जबरदस्त फायदा होणार आहे. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. तसेच भौतिक सुख अनुभवायला मिळतील, त्यामुळे उत्साहीत राहाल. त्याचबरोबर वाहन किंवा घर खरेदीचा योग जुळून येईल. तुमच्यातील सकारात्मक बदल पाहून काही लोकं तुमच्याकडे आकर्षित होतील. तसेच काही अडकलेली कामं मार्गी लागतील.

वृश्चिक : शुक्र ग्रहाचा गोचरामुळे या राशीच्या जातकांना अप्रत्यक्षरित्या लाभ होईल. शुक्र ग्रहाचा शुभ परिणाम दिसून येईल. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. विद्यार्थ्यांना या काळात फायदा होईल. स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष लाभ मिळेल.  नोकरीच्या शोधात असलेल्या जातकांना ऑफर मिळू शकते. तसेच अपेक्षित पगार मिळेल.

मकर : शुक्र ग्रहाच्या गोचरामुळे मकर राशीच्या जातकांना लाभ होईल. जोडीदारासोबत चांगले संबंध जुळून येतील. गेल्या काही दिवसांपासून असलेली कटुता दूर होईल. व्यवसायात प्रगती होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना पगारवाढ किंवा पदोन्नती होण्याची शक्यता आहे. उद्योग व्यवसायात या काळात प्रगती दिसून येईल. काही नवीन करार या काळात निश्चित होतील. त्याचा निश्चितच भविष्यात फायदा होईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.