Astrology : सूर्याचे कन्या राशीत गोचर, पुढचे पाच महिने या राशीच्या लोकांना होणार मोठा धनलाभ
सूर्य तुमच्या राशीचा स्वामी आहे आणि तुमच्या दुसऱ्या घरात प्रवेश करेल. या काळात तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे.
मुंबई : वैदिक ज्योतिषशास्त्रात (Astrology) सूर्याला ग्रहांचा राजा म्हणून वर्णन केले आहे. सूर्य कन्या राशीत प्रवेश करणार आहे. 17 सप्टेंबर रोजी सूर्य कन्या राशीत प्रवेश करेल आणि पुढील एक महिना कन्या राशीत राहील. सूर्य हा आत्मविश्वास आणि यशाचा कारक ग्रह मानला जातो. येत्या एक महिन्यात सूर्याचे हे संक्रमण पाच राशींसाठी खूप लाभदायक ठरणार आहे. या काळात या राशीच्या लोकांना भरपूर यश आणि लाभ मिळतील. चला जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी सूर्याचे राशी परिवर्तन फायदेशीर ठरणार आहे.
मिथुन राशीवर सूर्य संक्रमणाचा प्रभाव
तुमच्या सुखाच्या घरात म्हणजेच चौथ्या भावात सूर्याचे भ्रमण होईल. सूर्याच्या या भ्रमणामुळे सरकारी कामात यश मिळू शकते. कुटुंबातील सदस्यांमध्ये सामंजस्य राहील, तथापि, तुम्हाला तुमच्या आईच्या आरोग्याबाबत थोडे सावध राहावे लागेल. तुमच्या कर्म घरावर रवि सप्तमात असल्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमची स्थिती सुधारेल. आत्मविश्वास वाढेल आणि पदोन्नतीची शक्यता आहे. जर तुम्ही एखादे वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या काळात तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
सिंह राशीवर सूर्य संक्रमणाचा प्रभाव
सूर्य तुमच्या राशीचा स्वामी आहे आणि तुमच्या दुसऱ्या घरात प्रवेश करेल. या काळात तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या वडिलांचा सहवास आणि पाठिंबाही मिळेल. जर तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवले तर तुम्हाला फायदे मिळू शकतात. या काळात तुमची चांगली कृत्ये तुमच्या कुटुंबातील सदस्यांना गौरव मिळवून देऊ शकतात. काही लोकं या काळात वडिलांचा सल्ला घेऊन स्वत:चा व्यवसायही सुरू करू शकतात. तथापि, वाणीच्या घरामध्ये सूर्याच्या उष्ण ग्रहाची उपस्थिती देखील आपल्या बोलण्यात कठोरता आणू शकते, म्हणून बोलताना आपले शब्द विचारपूर्वक निवडावे लागतील.
कन्या राशीवर सूर्य संक्रमणाचा प्रभाव
या काळात सूर्य तुमच्या राशीत भ्रमण करेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढवेल. तुम्ही साहसी उपक्रमात भाग घेतल्यास तुमच्या नावाची चर्चा होऊ शकते. या राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन सामान्य राहील, चांगले परिणाम मिळण्यासाठी जोडीदाराशी मोकळेपणाने बोला. यावेळी तुमचे आरोग्य देखील पूर्वीपेक्षा चांगले असेल, जर तुम्ही कोणत्याही जुनाट आजाराने त्रस्त असाल तर तुम्हाला त्यातून आराम मिळू शकेल. सूर्य तुम्हाला सरकारी कामातही यश देईल. प्रेम जीवनात आनंद राहील, जे अविवाहित आहेत त्यांना या काळात कोणीतरी खास व्यक्ती भेटू शकते.
वृश्चिक राशीवर सूर्य संक्रमणाचा प्रभाव
तुमच्या लाभाच्या घरात सूर्य असल्याने तुम्हाला विविध स्त्रोतांकडून लाभ मिळू शकतो. या काळात तुम्हाला व्यवसायात लक्षणीय नफा मिळू शकतो. मोठ्या भावंडांशी संबंध सुधारतील आणि त्यांच्याकडून तुम्हाला फायदा ही होणार आहे. तथापि, या राशीच्या लोकांना प्रेम संबंधांबाबत थोडे सावध राहावे लागेल. तुम्ही भविष्यासाठी योजना कराल आणि त्यात तुम्हाला अनपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. वृश्चिक राशीचे लोकं या काळात तोटयाचे रुपांतर फायद्यात करू शकतात. तुमचे मत लोकांना उपयोगी पडेल आणि सामाजिक स्तरावर तुमचे वर्तुळ वाढेल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)