Astrology: येणारे 140 दिवस या राशींसाठी शुभ, तीन ग्रहांची बरसणार कृपा
गुरु, मंगळ आणि बुध शुभ असल्यास व्यक्तीचे नशीब बदलते. कोणकोणत्या राशींसाठी येणारे 140 दिवस शुभ असणार आहेत ते जाणून घेऊया.
Astrology: ज्योतिषशास्त्रात ग्रहांचे संक्रमण खूप महत्वाचे आहे. ग्रहांच्या राशीतील बदलाचा (Planet Transit) सर्व राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडतो. ज्योतिषाच्या मते, येणारे 140 दिवस काही राशींसाठी खूप फायदेशीर असतील. त्यांच्यावर गुरु, मंगळ आणि बुध यांच्या विशेष आशीर्वादाने वर्षाव होईल. गुरु, मंगळ आणि बुध शुभ असल्यास व्यक्तीचे नशीब बदलते. कोणकोणत्या राशींसाठी येणारे 140 दिवस शुभ असणार आहेत ते जाणून घेऊया.
- मिथुन- कामात यश मिळेल. थांबलेली कामे पुन्हा सुरू करता येतील. चांगल्या लोकांशी संपर्क वाढेल. प्रवासाचा आनंद मिळेल. व्यवसायात चांगला फायदा होईल. जे काही काम तुम्ही हातात घ्याल त्यात तुम्ही यशस्वी व्हाल. प्रेमसंबंध मजबूत होतील.
- सिंह- आर्थिक बाजू मजबूत राहील. सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ वरदानाचा आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील. पद आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. नवीन वाहन किंवा घर खरेदी करू शकता. व्यापारी वर्गाला विशेषतः चांगले परिणाम मिळतील.
- तूळ- नोकरीत यश मिळेल. कामाच्या ठिकाणी बदल होऊ शकतो. व्यवसायात लाभ होईल. कौटुंबिक कलह संपुष्टात येईल. धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. नोकरीच्या ठिकाणी कामाचे कौतुक होईल. पती-पत्नीमध्ये योग्य सामंजस्य राहील.
- वृश्चिक- नोकरी आणि व्यवसायासाठी वेळ शुभ राहील. वैवाहिक जीवनात आनंदाचा अनुभव येईल. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. आध्यात्मिक कार्यात सहभागी व्हाल. विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या क्षेत्रात यश मिळेल. तुमच्या कर्तृत्वाने वरिष्ठ अधिकारी प्रभावित होतील.
हे सुद्धा वाचा
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)