Astrology : बुधादित्य योगाने चमकणार या चार राशीच्या लोकांचे भाग्य, मिळणार मोठे यश
लवकरच बुधादित्य योग (Budhatitya yoga) तयार होणार आहे. मिथुन आणि कन्या राशीसाठी बुध हा कारक मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रह 1 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:23 वाजता संक्रमण करेल आणि 8 फेब्रुवारीला मावळेल. यानंतर 20 फेब्रुवारी रोजी मकर राशीतून धनु राशीत प्रवेश करेल.
मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार बदलत्या ग्रहांच्या हालचालींचा सर्व जातकांच्या जीवनावरही परिणाम होतो. ग्रहांचे संक्रमण काहींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ आहे. 1 फेब्रुवारी रोजी बुध ग्रह मकर राशीत प्रवेश करेल. या राशीमध्ये सूर्य हा ग्रह आधीपासून आहे. अशा स्थितीत बुधादित्य योग (Budhatitya yoga) तयार होणार आहे. मिथुन आणि कन्या राशीसाठी बुध हा कारक मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रह 1 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:23 वाजता संक्रमण करेल आणि 8 फेब्रुवारीला मावळेल. यानंतर 20 फेब्रुवारी रोजी मकर राशीतून धनु राशीत प्रवेश करेल. 1 फेब्रुवारी रोजी बनलेल्या बुधादित्य राजयोगाचा सर्व राशींवर परिणाम होईल, परंतु या 4 राशींवर काही विशेष प्रभाव दिसून येतील. चला जाणून घेऊया या राशींबद्दल.
या राशीच्या लोकांना होणार लाभ
मेष
मेष राशीच्या लोकांना बुधादित्य राजयोगामुळे यश मिळेल. करिअरमध्ये प्रगतीसोबतच आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. यावेळी तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात आणि तुम्ही परदेश दौऱ्यावरही जाऊ शकता. याशिवाय आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला कुटुंबाकडून सहकार्य मिळेल.
मिथुन
बुधादित्य योग तयार झाल्यामुळे मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यावसायिकांचे व्यावसायिक संबंध दृढ होतील आणि गुंतवणुकीसाठीही हा काळ चांगला आहे. नोकरी करणाऱ्या लोकांनाही फायदा होईल आणि त्यांच्या आर्थिक स्थितीतही सुधारणा होईल. मिथुन राशीचे लोक या काळात कुठेतरी फिरू शकतात.
सिंह
बुधादित्य योग तयार झाल्यामुळे सिंह राशीच्या लोकांना अनेक नवीन संधी मिळतील. यावेळी तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत काही शुभ प्रसंगी जाऊ शकता किंवा तीर्थयात्रेलाही जाऊ शकता. आर्थिक स्थितीही मजबूत राहील.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठी बुधादित्य योग खूप चांगले परिणाम देईल. नोकरी आणि व्यवसायात भरपूर फायदा होईल. मेहनतीचे फळ मिळेल आणि यश मिळेल. लाभाचे स्रोतही वाढतील आणि जुनी कर्जेही फेडली जातील. तुम्हाला कुटुंब आणि जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)