Astrology : या चार राशीचे जोडिदार असतात सर्वाधीक प्रामाणिक, निभावतात शेवटपर्यंत नातं
या राशीच्या लोकांना त्यांचे संबंध काळजीपूर्वक कसे जपायचे हे माहित असते. ते आपल्या जोडीदाराप्रती असलेल्या सर्व जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडतात. कर्क राशीच्या मुलींशी लग्न करणाऱ्याला अत्यंत सुरक्षित वाटते. या मुली आपल्या जोडीदाराप्रती निष्ठेसाठी पहिल्या क्रमांकावर असतात आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्या जोडीदाराला सोडत नाहीत.
मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) 12 राशींचे शासक ग्रह आहेत. राशींवर ग्रहांचे वेगवेगळे प्रभाव पडतात. त्यामुळे स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वात फरक आहे. काही राशीचे लोक स्वभावाने शांत असतात. काही अंतर्मुखी असतात तर काही स्वार्थी असतात. ज्योतिष शास्त्रानुसार 4 राशी प्रेमाच्या बाबतीत खूप प्रामाणिक असतात. आपल्या जोडीदारासाठी ते काहीही करायला तयार असतात. त्या आपल्या जोडीदाराच्या भावना समजुन घेतात. जीवनाच्या कठीण काळात त्या आपल्या जोडीदारासोबत खंबीरपणे उभअया राहातात. असे जोडीदार फक्त भाग्यवान लोकांनाच मिळतात. आयुष्यात यशस्वी होण्यामागे यांचा खुप मोठा वाटा असतो.
वृषभ
या राशीचा स्वामी शुक्र आहे. हे राशीचे दुसरे चिन्ह आहे. या राशीचे लोकं जबाबदार असतात. वृषभ राशीचे लोक त्यांच्या जोडीदारांना कधीही विसरत नाहीत आणि त्यांना आयुष्यभर साथ देतात. या राशीच्या मुली प्रत्येक परिस्थितीत त्यांच्या जीवनसाथीसोबत उभ्या असतात आणि प्रेमाच्या बाबतीतही त्या इतर सर्व राशीच्या मुलींपेक्षा पूर्णपणे वेगळ्या असतात.
मिथुन
मिथुन राशीचे लोकं आपले सर्व त्रास विसरून आधी आपल्या लाइफ पार्टनरचा विचार करतात. या राशीची मुलं चांगले पती सिद्ध होतात. याशिवाय मुलींच्या बाबतीत सांगायचे झाल्यास ते आपल्या जोडीदाराप्रती अत्यंत निष्ठावान असतात. या राशीच्या मुली मोठ्या उत्कटतेने प्रेम करतात. त्या ज्याच्यावर प्रेम करते त्याच्याशी लग्न करण्यावर विश्वास ठेवतात. त्यांच्यासोबत जीवन जगणे सोपे आहे.
कर्क
या राशीच्या लोकांना त्यांचे संबंध काळजीपूर्वक कसे जपायचे हे माहित असते. ते आपल्या जोडीदाराप्रती असलेल्या सर्व जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडतात. कर्क राशीच्या मुलींशी लग्न करणाऱ्याला अत्यंत सुरक्षित वाटते. या मुली आपल्या जोडीदाराप्रती निष्ठेसाठी पहिल्या क्रमांकावर असतात आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्या जोडीदाराला सोडत नाहीत. त्या जोडीदारासोबत नेहमी सावलीसारख्या उभ्या असतात.
तूळ
तूळ राशीचे लोक प्रेमाच्या बाबतीत उदार असतात. ते चांगले प्रेमी आहेत आणि केवळ त्यांच्या भागीदारांबद्दल विचार करतात. त्यांच्यासाठी त्यांचा जोडीदार प्रथम येतो. तो पहिल्या क्रमांकाचा प्रियकर मानला जातो. या राशीच्या मुली आपल्या लाइफ पार्टनरची खूप काळजी घेतात. त्यांचे त्यांच्या जोडीदाराशी असलेले नाते खूप गोड असते. त्या नेहमीच जोडीदाराशी एकनिष्ठ असतात. परिस्थितीशी जुळवून घेण्यातही त्या पटाईत असतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)