Astrology: विश्वासाने नातं निभावतात या राशींचे लोकं, फसवेगिरी यांना जमतच नाही!
कोणत्याही नात्यात विश्वास महत्त्वाचा असतो. सर्व जग विश्वासावर अवलंबून आहे. विश्वास हा नात्यातला व प्रामाणिकपणाचा प्राण आहे. विश्वासातून सामर्थ्य वाढते. सामर्थ्यशाली माणूस विश्वासू असतो. विश्वासाने जग जिंकता येते.
विश्वास हा प्रत्येक नात्याचा पाय आहे. व्यव्हारातसुद्धा विश्वास फार महत्वाचा असतो. जे लोकं विश्वासू असतात त्यांना आयुष्यभर जपले पहिले. कोणत्याही नात्यात विश्वास महत्त्वाचा असतो. सर्व जग विश्वासावर अवलंबून आहे. विश्वास हा नात्यातला व प्रामाणिकपणाचा प्राण आहे. विश्वासातून सामर्थ्य वाढते. सामर्थ्यशाली माणूस विश्वासू असतो. विश्वासाने जग जिंकता येते. विश्वासातून आत्मस्फूर्ती मिळते. विश्वास मानवी जीवनाचा एक घटक आहे. कोणतेही कार्य करताना त्याच्या मनात विश्वास पक्का असावा. विश्वासामुळेच सफलता प्राप्त होते. विश्वास माणसाला नवसंजीवनी देतो. विश्वासामुळेच आपले कार्य यशस्वी होते. स्वत:चा स्वत:वर विश्वास असणे गरजेचे असते. स्वत:चा विश्वास पक्का असला की कोणतेही काम आपण तडीस नेतो. विश्वासातून एक आत्मऊर्जा मिळते. प्रेरणा-स्फूर्तीचा उद्गाता विश्वास आहे. जोतिष्यशास्त्रात (Astrology) अशा काही राशी आहेत ज्या अत्यंत विश्वासू (faithful zodiac) आहेत. या राशीच्या लोकांवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवू शकता. जाणून घेऊया या कोणत्या राशी आहेत.
- मेष राशी- विश्वासू राशींच्या यादीत, मेष राशीचे नाव पाहल्या क्रमांकावर येते. मेष राशीचे लोक प्रामाणिक, दयाळू आणि सत्यवादी असतात. या लोकांना इकडे तिकडे बोलणे आवडत नाही, उलट त्यांना थेट विषयावर बोलणं आवडतं. मेष राशीवर मंगळ ग्रहाचं राज्य असतं. तसंच मेष एक चर राशी आहे. या राशीचे लोकांसोबत तुमच्या आयुष्यातील रहस्ये कोणत्याही भीतीशिवाय सांगू शकतात आणि या गुणामुळे लोकांना या राशीचे लोक खूप आवडतात.
- कर्क राशी- ज्योतिषशास्त्रानुसार कर्क राशीचे लोक विश्वासार्ह असतात. याव्यतिरिक्त, ते खूप भावनिक देखील असतात. ज्योतिषशास्त्रानुसार, कर्क ही चर राशी आहे. तसेच, जर तुमचा कोणी मित्र किंवा सोबती कर्क राशीचा असेल, तर ही तुमच्यासाठी भेटवस्तूपेक्षा काही कमी नाही. आस्तिक असण्यासोबतच ते सुख-दुःखातही उभे राहिलेले दिसतात. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे, ज्यामुळे ते नेहमी कूल असतात.
- सिंह राशी- ज्योतिष शास्त्रानुसार या राशीचे लोक विश्वासार्ह आणि प्रामाणिक असतात. ते कधी कोणाचा विश्वास तोडत नाहीत आणि कठीण प्रसंगी कुणाची साथ सोडत नाहीत. खोटं बोलणं त्यांना अजिबात आवडत नाही. सिंह राशीवर सूर्य ग्रहाचं राज्य आहे. तसेच सिंह एक स्थिर राशी आहे. सिंह राशीच्या लोकांशी मैत्री करताना या गोष्टीची विशेष काळजी घ्या. कारण फसवणूक करणाराही सुटणार नाही. सिंह राशीच्या लोकांचं व्यक्तिमत्व अतिशय अद्भुत असतं.
- मकर राशी- या राशीच्या लोकांच्या प्रामाणिकपणाची उदाहरणे लोक देत असतात. एवढंच नाही तर त्यांच्यावर सहज विश्वास ठेवता येतो. मात्र भावूक झाल्यामुळे त्यांना त्यांच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवता येत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार, मकर राशीचा स्वामी शनी आहे, जो त्यांना मेहनती देखील बनवतो. तसंच मकर एक चर राशी आहे. म्हणूनच हे लोक आयुष्यात कोणाचीही फसवणूक करत नाहीत.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)