Astrology : शुक्र आणि मंगळाच्या युतीने प्रभावीत होते कामवासना, तुमच्या राशीवर असा होणार परिणाम

ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ आणि शुक्राचा संयोग अनेक राशीच्या लोकांसाठी त्रासदायक ठरू शकतो. तर दुसरीकडे ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ आणि शुक्र यांच्या संयोगामुळे जातकांचे प्रेमसंबंध प्रभावित होतात.

Astrology : शुक्र आणि मंगळाच्या युतीने प्रभावीत होते कामवासना, तुमच्या राशीवर असा होणार परिणाम
मंगळ आणि शुक्र युतीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jun 08, 2023 | 1:02 PM

मुंबई :  ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) ग्रहांच्या संक्रमणाचा मानवी जीवनावर थेट परिणाम होतो. पंचांगानुसार शुक्राचे संक्रमण कर्क राशीत झाले असून मंगळ आधीच कर्क राशीत आहे. 30 मे ते 1 जुलै या कालावधीत शुक्र आणि मंगळाची युती कर्क राशीत असेल. ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ आणि शुक्राचा संयोग अनेक राशीच्या लोकांसाठी त्रासदायक ठरू शकतो. तर दुसरीकडे ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ आणि शुक्र यांच्या संयोगामुळे जातकांचे प्रेमसंबंध प्रभावित होतात. या दरम्यान शरीरात कामवासना वाढते. मंगळ आणि शुक्र यांच्या संयोगाचा फायदा अनेक जातकांना होतो. एखाद्या व्यक्तीचा मंगळ बलवान किंवा अधिक प्रभावशाली असेल व शुक्र कमजोर असेल तर त्या व्यक्तीचे विचार तामसी होतात.

12 राशींवर शुक्र आणि मंगळाच्या संयोगाचा प्रभाव

  1. मेष : थांबलेले काम पूर्ण होईल. विद्यार्थ्यांसाठी अनुकूल काळ, आर्थिक लाभ होईल. प्रेम प्रकरणांमध्ये यश मिळेल. जोडीदाराकडून आदर मिळेल.
  2. वृषभ : विद्यार्थ्यांच्या समस्या वाढतील, प्रेमसंबंधात अडथळा येईल, वाणीवर नियंत्रण ठेवा. वैवाहिक जीवनात गैरसमज वाढतील. विवाह योग जुळण्यास विलंब होईल.
  3. मिथुन : आरोग्याकडे लक्ष द्या. प्रियकराशी मतभेद होतील, प्रवासाचे योग. प्रेमप्रकरणांमध्ये घाई करणे चुकीचे ठरेल. जोडीदार अविश्वास दाखवेल.
  4.  कर्क : आर्थिक लाभ होईल, विद्यार्थ्यांसाठी ग्रहमान चांगले राहील, प्रेमसंबंधांची सुरुवात होण्याची शक्यता आहे. कामवासना वाढेल. जोडीदार आनंदी राहील. नाते घट्ट होईल.
  5. सिंह: आत्मविश्वास वाढेल, नवीन निर्णय घ्याल. उत्पन्नात घट होईल. जोडीदारासोबतचे जुने मतभेद दूर होतील. प्रेम बहरू लागेल.
  6. कन्या : धार्मिक कार्यात मन व्यस्त राहील, अचानक धनप्राप्ती होईल, प्रेमजीवन चांगले राहील. नात्यात मधूरता येईल. विलासी जीवन अनुभवाल.
  7. तूळ राशी: कुटुंबात आनंद असेल, व्यावसायिकांना फायदा होईल, पत्नीशी मतभेद होतील. नात्यात तडजोड करावी लागेल. मतभेद टाळण्यासाठी जोडीदाराला वेळ द्या.
  8. वृश्चिक : हरवलेले प्रेम सापडेल, वाणीवर नियंत्रण ठेवा, विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ. वैवाहिक जीवनात गोडवा अनुभवाल.
  9.  धनु: कुटुंबात तणाव, वैवाहिक कार्यक्रमात सहभागी व्हाल, आर्थिक लाभ होईल. जोडीदारासोबत दुरावा जाणवेल. वैचारिक मतभेद वाढतील.
  10. मकर : व्यवसायात नफा होईल, नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी चांगला काळ, नात्यात अडथळे येण्याची शक्यता. गैरसमज टाळण्यासाठी पारदर्शकता ठेवा.
  11. कुंभ: शत्रूंचे वर्चस्व राहील, खाजगी क्षेत्रातील समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे, उत्पन्नाचे स्रोत कमी होतील. प्रेम जीवनात कटूता येईल.
  12. मीन:  प्रेमसंबंध दृढ होतील, नवीन वाहन खरेदी कराल. जोडीदारासोबत फिरायला जाण्याचा वेत आखाल. प्रेमप्रकरणांसाठी योग्य काळ.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.