वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) पत्रिकेत शुक्राचे स्थान अतिशय महत्त्वाचे असते. शुक्राच्या शुभ स्थानामुळे भौतिक सुख, वैवाहिक सुख आणि संतती सुख प्राप्त होते. शुक्राच्या स्थितीवरून एखाद्या व्यक्तीच्या विवाह आणि मुलांशी संबंधित माहिती जाणून घेणे शक्य आहे. जेव्हा कोणताही ग्रह राशी बदलतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींच्या आर्थिक स्थिती, वैवाहिक जीवन आणि आरोग्यवर होतो. ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र ग्रह 7 ऑगस्ट रोजी कर्क राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत सूर्य ग्रह आधीच स्थित आहे. शुक्र कर्क राशीत प्रवेश करताच सूर्याशी युती होईल. या युतीचा प्रभाव सर्व राशींच्या जीवनावर दिसून येईल. तीन राशींवर या राशीचा शुभ प्रभाव पडेल.
ज्योतिषशास्त्रानुसार, कोणत्याही ग्रहाच्या हालचालीचा सर्व राशींच्या जीवनावर शुभ आणि अशुभ दोन्ही प्रभाव पडतो. त्याचबरोबर तूळ, धनु आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ थोडा त्रासदायक ठरेल. त्यांचे जोडीदाराशी वाद होऊ शकतात. नात्यात दुरावा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात थोडे सावधपणे वागणे योग्य राहील.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)