Astrology: या तीन राशींवर आज राहणार बजरंगबलीची कृपा
मान्यतेनुसार मंगळा गौरीचे व्रत श्रावण महिन्यातील मंगळवारी केले जाते. हे व्रत पाळल्याने माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या कृपेने मनोकामना पूर्ण होतात.
आता उत्तर भारतीयांचा श्रावण महिना (Shravan 2022) सुरू आहे. श्रावण महिन्याचा दुसरा मंगळवार आज आहे. विशेष म्हणजे या दिवशी श्रावण शिवरात्रीचा एक विशेष योगायोगही जुळून येत आहे. आजचा दिवस हा दिवस भगवान शंकरासोबत बजरंगबलीचा आशीर्वाद मिळविण्याचा विशेष दिवस आहे. मान्यतेनुसार मंगळा गौरीचे व्रत श्रावण महिन्यातील मंगळवारी केले जाते. हे व्रत पाळल्याने माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या कृपेने मनोकामना पूर्ण होतात. सांसारिक आणि वैवाहिक जीवन आनंदी होते. विविध ज्योतिषांच्या मते,श्रावण महिन्याचा दुसरा मंगळवार काही राशींसाठी खूप फायदेशीर आणि शुभ ठरेल. बजरंगबलीच्या कृपेने या राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळेल.
- मकर- मकर राशीच्या लोकांसाठी श्रावणाचा दुसरा मंगळवार खूप शुभ ठरू शकतो. असे मानले जाते की, हनुमानजींची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते. जीवनात आनंद राहतो. हनुमान मंदिरात जावून दर्शन घेतल्यास याचा जास्त लाभ होईल. बजरंगबलीला रुईच्या फुलांचा हार घालावा व आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवावी.
- तूळ- तूळ राशीच्या लोकांना आज बजरंगबलीच्या कृपेने शुभ वार्ता मिळू शकते. शास्त्रानुसार हनुमानाची पूजा करणाऱ्या भक्तांवर शनिदेवाचा कोणताही विपरीत परिणाम होत नाही असे सांगितले आहे. यावेळी सावनचा दुसरा मंगळवार तूळ राशीच्या लोकांसाठी आनंद घेऊन येईल.
-
वृषभ- ज्योतिषशास्त्रानुसार श्रावणाचा हा दुसरा मंगळवार वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहील. मंगळवारी बजरंगबलीची विधिवत पूजा केल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात आणि तुमच्या दुःखांचा अंत होऊ शकतो. बजरंगबलीच्या अपार कृपेने आर्थिक प्रगतीसोबतच करिअरमध्येही प्रगती होण्याची चिन्ह आहे.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)