Astrology : पत्रिकेत अशाप्रकारे तयार होतो सिंहासन राजयोग, उघडतात नशीबाचे दारं
सिंहासन राजयोगाच्या प्रभावाने, व्यक्ती केवळ स्वतःचे नशीब सुधारत नाही तर कुटुंबातील इतर सदस्यांना देखील त्याचा लाभ होतो. सिंहासन राजयोगाच्या प्रभावामुळे व्यक्तीला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत नाही.
मुंबई : राजयोग हे नाव ऐकताच मनात जे येते ते म्हणजे राजासारखे जीवन पण ज्योतिषशास्त्रातही राजयोगाचे (Rajyoga) अनेक प्रकार सांगितले आहेत. प्रत्येक राजयोगाचे वेगवेगळे परिणाम होतात. ज्योतिषशास्त्रानुसार राजयोगाचे अनेक प्रकार आहेत. यापैकी एक सिंहासन राजयोग आहे. ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत सिंहासन राजयोग तयार होतो त्यांना पैशांसंबंधी समस्या येत नाहीत आणि सरकारी नोकरी मिळण्याचीही शक्यता जास्त असते जर कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीत दहाव्या घराचा स्वामी शनि, मेष राशीच्या दशम राशीचा स्वामी मकर राशीच्या पहिल्या, चौथ्या, सातव्या किंवा दहाव्या भावात बसला असेल तर सिंह राजयोग तयार होतो. याशिवाय दहाव्या घराचा स्वामी दुसऱ्या घरात किंवा पाचव्या किंवा नवव्या घरात असला तरी सिंहासन राजयोग तयार होतो. ज्योतिषशास्त्रात सिंहासन राजयोग अत्यंत शुभ मानला जातो. असे म्हणतात की ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सिंहासन राजयोग तयार होतो, तो राजाप्रमाणे आयुष्य जगतो.
सिंहासन राजयोगाचे लाभ
ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत सिंहासन राजयोग तयार होतो, त्याला आपल्या मेहनतीच्या जोरावर कामाच्या ठिकाणी खूप मान-सन्मान मिळतो. तसेच ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत सिंहासन राजयोग तयार होतो, त्याला जबाबदारीची जाणिव होते. तो कठोर परिश्रम करण्यास घाबरत नाही.
सिंहासन राजयोगाने भाग्य चमकते
सिंहासन राजयोगाच्या प्रभावाने, व्यक्ती केवळ स्वतःचे नशीब सुधारत नाही तर कुटुंबातील इतर सदस्यांना देखील त्याचा लाभ होतो. सिंहासन राजयोगाच्या प्रभावामुळे व्यक्तीला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत नाही. तो आर्थिकदृष्ट्या बऱ्यापैकी संपन्न असतो.
असे लोकं चांगले सल्लागार असतात
ज्या लोकांच्या पत्रिकेत सिंहासन राजयोग तयार होतो त्यांना त्यांच्या आयुष्यात जास्त बदल करणे आवडत नाही. शिवाय, असे लोक खूप चांगले सल्लागार आणि वक्ते असतात. या राजयोगाच्या प्रभावामुळे माणूस अभ्यासात खूप वेगवान होतो. त्यामुळे अशी व्यक्ती शैक्षणिक क्षेत्रात खूप प्रगती करत असते. असे लोकं आपल्या बुद्धीच्या बळावर काम करण्यातही तरबेज असतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)