Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 8 मार्च 2023, या राशीच्या लोकांनी मोठे व्यवहार टाळावे

आजचे राशी भविष्य, जाणून घ्या कसा जाणार तुमचा आजचा दिवस. या राशीच्या लोकांना मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल.

Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 8 मार्च 2023, या राशीच्या लोकांनी मोठे व्यवहार टाळावे
राशी भविष्यImage Credit source: Tv9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 08, 2023 | 12:05 AM

मुंबई, ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Todays rashibhavishya Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

आजचे बारा राशींचे राशी भविष्य

मेष:

शासकीय नोकरदारासाठी सफलदायक दिवस आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाण यश मिळेल. विवाहइच्छुकांचे विवाह जुळतील. कायदेशीर कामात यश मिळेल. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. अपेक्षित यश लाभेल. गृहसौख्य, पत्नीची साथ मिळेल. व्यापारात भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल. व्यापारात लाभ होईल. लेखन, कला, कायदा क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार मिळतील. मानसन्मान मिळेल.

वृषभ:

मान अपमानचे प्रसंग घडतील. नोकरीत प्रतिस्पर्धी वरचढ होतील. कामात असंतोषजनक वातावरण राहिल. हितशत्रुकडून फसवणुकीची शक्यता आहे. वाहन घर बदलण्याचे प्रसंग घडतील. लोकांचा विरोध व असहकार्य लाभेल. संतती व पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या. स्वभावात राग निर्माण होईल. मानसिक स्वास्थ बिघडणार आहे. काळजी घ्या.

हे सुद्धा वाचा

मिथुन:

नोकरीतील बदल लाभदायक ठरतील. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव राहिल. स्वतःच्या मनाने विचाराअंतीच निर्णय घ्या. यश नक्की मिळेल. आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल. शासकीय कामकाजातून यश मिळेल. योजनेतून लाभ होतील. व्यापार नविन बदल प्रयोग यशस्वी ठरतील. गृहसौख्य पत्नीकडून सहकार्य लागेल. संततीची विद्याभ्यासात रुची वाढेल. दिवस शुभ आहे.

कर्क:

आशाजनक वातावरण निर्माण होईल. नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल. भांवडाकडून सहकार्य लाभेल. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. वाहन व घर खरेदीचा योग आहे.आईच्या प्रकृतिकडे लक्ष द्यावे. आजचा दिवस आनंदी जाईल. पराक्रम व क्षमतेमुळे यश व फायदा होईल. व्यापार उद्योगात प्रगती राहिल. खर्च मात्र विचार करून करा.

सिंह:

भांवडाची त्यांच्या कार्यातील प्रगती पाहून मनाला समाधान लाभेल. नोकरीत कामाच्या ठिकाणी स्वःताला सिद्ध कराल. आपली प्रशंसा कौतुक केले जाईल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मानसन्मानात वाढ होईल. व्यापारात प्रयत्नाच्या तुलनेन अधिक लाभ होतील. नवीन भागीदारासोबत व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

कन्या:

नातेवाईकांकडून शुभ समाचार ऐकायला मिळतील. बौद्धिक आणि शैक्षणिक कार्यात मान सन्मान मिळेल. कुंटुंबासोबत तिर्थक्षेत्री प्रवास घडेल. भावंडाच्या शुभवार्ता कळतील. नोकरीत प्रतिष्ठित, प्रसिद्ध व्यक्तीशी संबंध वाढतील. आज व्यापार वाढीच्या दृष्टीने उत्तम दिनमान आहे. व्यापारामध्ये विस्तार होईल. स्थावर मालमत्तेची विक्री करताना घाई गडबड करु नका. काळजीपूर्वक व्यवहार करा.

तुला:

अतिउत्साह व अतिरेकपणा मात्र टाळावा. नोकरीत अडकलेली कामे पूर्ण होतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आपले प्रयत्न सफल होतील. मान सन्मान मिळेल. विरोधकांची मने जिंकाल. व्यापारात भागीदारीत कायदा होण्याचे योग आहेत. बांधकाम रिअल इस्टेट क्षेत्रातील व्यक्तींना आज भरभरटीचा दिवस आहे. नवीन प्रस्ताव हाती येतील. कामे पूर्णत्वास जातील. व्यावहारिक समस्या दूर होतील. कौटुंबिक प्रसन्नता राहील. आरोग्य उत्तम राहणार आहे.

वृश्चिक:

अनिद्रेचा त्रास जाणवेल. मनावर संयम राखण्याचा प्रयत्न करा. नोकरीच्या ठिकाणी कामात अडचणी अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. चिंताग्रस्न मन राहील. व्यापारात समस्या निर्माण होतील. आज कर्ज घेणे देणे शक्यतो टाळावे.आर्थिक हानी होण्याची संभवना आहे. मोठे व्यवहार उलाढाली यात फसगत होईल. आरोग्य बाबतीत विशेष काळजी घ्यावी. प्रवास नुकसानकारक राहिल.

धनु:

आपली कार्यक्षमता वाढणार आहे. कार्यक्षेत्र विस्तारेल.रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रयत्नांना यश मिळेल. जुन्या संधी पुन्हा उपलब्ध होतील. मोठे पद, मानसन्मान प्रसिद्धी मिळेल. कला, साहित्य, क्रीडा या क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ चांगला होईल. व्यापारात गुंतवणूक कायदेशीर ठरेल. अपेक्षेपेक्षा आधिक लाभ होईल.धनसंचय वाढेल. वराजकीय सामाजिक क्षेत्रात यश मिळेल. आरोग्य उत्तम राहिल. प्रगतीकारक दिवस राहील.

मकर:

सामाजिक मान सन्मान वाढेल. आज शनि कुंभ राशीत प्रवेश करीत आहे. परिणाम स्वरूप पुढील काळात आपल्या कार्यक्षेत्रात आर्थिक कौटुंबिक बाबतीत परिवर्तन बदल घडणार आहेत. व्यापारात एखादा मोठा व्यवहार होण्याची शक्यता आहे. आपल्याकडून वाद निर्माण होऊ शकतात. अतिरिक्त कामातून उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे. नवीन रोजगारात परिक्षेत व मुलाखतीत यश मिळेल. कुटुंबात स्नेह वाढेल. दुरवरचे प्रवास हितकारक ठरतील.

कुंभः

आज आपणास नशीबाची साथ लाभणार आहे. कला क्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. नोकरी रोजगारातील बदल प्रगतीकारक ठरतील. आपल्या हातून आध्यात्मिक सामाजिक कार्य घडेल. तिर्थक्षेत्री प्रवास घडतील.व्यवहारात आर्थिक लाभ झाल्याने आनंदी राहाल. व्यवहार कुशलतेमुळे आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्तुतीस पात्र ठराल. साधुसंत व्यक्तींचा सहवास लागेल. परमेश्वरवर विश्वास दृढ होईल. धार्मिक शिक्षण क्षेत्रात कर्तुत्वाची संधी मिळेल. आरोग्य प्रकृती स्थिर राहिल.मानसिक स्वास्थ लाभेल.

मीनः

व्यक्तिगत समस्या निर्माण होतील. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्या. आहारात नियमितता ठेवा. बुद्धीचे कामे अधिक करू नका. मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल. चोरी अथवा नुकसानीची घटना घडण्याची शक्यता आहे. अपचन पोटदुखी याकडे दुर्लक्ष करू नये. नोकरी व्यापारात त्रासदायक दिवस राहील.कर्ज घेणे आज टाळा. घाई गडबडीतील निर्णय अंगाशी येऊ शकतात. प्रवास नुकसानकारक राहिल. प्रवासात दुर्घटनेची शक्यता आहे. कुटुंबातील वरिष्ठ सदस्य आणि संततीची विशेष काळजी घ्या.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.