Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 5 एप्रिल 2023, या राशीच्या लोकांना राजाश्रय मिळेल

आजचे राशी भविष्य. जाणून घ्या कसा जाणार तुमचा आजचा दिवस. या राशीच्या विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील.

Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 5 एप्रिल 2023, या राशीच्या लोकांना राजाश्रय मिळेल
आजचे राशी भविष्यImage Credit source: Tv9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 05, 2023 | 12:05 AM

मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Todays rashibhavishya Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

आजचे बारा राशींचे भविष्य

मेष

वादविवाद आणि गैरसमज वाढतील असे संवाद टाळावेत. मिळालेल्या लाभात मन समाधानी राहणार नाही. दुरवरचे प्रवास शक्यतो टाळा. खरेदी विक्रीचा व्यवहार आज करू नका. कौटुंबिक ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे. राग आणि चिडचिडेपणावर नियंत्रण ठेवा. वादविवादातून मनस्ताप होईल. खर्चात वाढ होईल. कायदेशीर प्रकरणात कारवाई होण्याची शक्यता आहे. प्रकृतीकडे लक्ष द्या. मानसिक स्वास्थ संभाळा. दुर्व्यसनांपासून सावध रहा.

वृषभ

जोडीदाराशी विवाद टाळा. क्रिडा क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधीचा योग आहे. नोकरीत स्थान बदल होईल. वेळेचा अपव्यय टाळा. प्रवासातून लाभ होणार नाही. प्रवास निरर्थक ठरतील. नोकरीत स्थान बदल होईल. प्रेमप्रकरणात वितुष्ट निर्माण होऊ शकते. संततीविषयी चिंता निर्माण होईल. त्यांच्या विद्याभासाकडे लक्ष द्यावे. व्यापारात नुकसान होण्याची शक्यता आहे. घाई गडबडीतील निर्णय अंगाशी येऊ शकतात. चोरी अथवा नुकसान घडण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

मिथुन

वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. बढ़ती व वेतनवाढीचा योग आहे. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव वाढणार आहे. कार्यक्षेत्रात वाढ होईल. नवीन समुहाशी जोडले जाण्याची शक्यता आहे. राजकीय सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. राजाश्रय मिळेल. शासकीय दप्तरी रखडलेली कामे मार्गी लागतील. पतीपत्नीतील संबंध दृढ होतील. आजच दिनमान आत्मविश्वासाने परिपूर्ण राहिल. कार्यक्षेत्रात स्वतःला सिद्ध कराल. आरोग्य उत्तम राहील.

कर्क

शैक्षणिक कार्यात यश मिळेल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक लाभ होईल. व्यापारात उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यात यश येईल. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपक्षे प्रमाणे यश येईल. दिवसभर मन प्रसन्न राहिल. कार्यक्षमतेमुळे फायदा होईल. व्यापार उद्योगात फायदा होईल. खर्च मात्र विचार करून करा. सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मानसन्मानात वाढ होईल. व्यापारात नवीन भागीदारा सोबत नवीन प्रकल्पाची सुरुवात कराल. कुटुंबाची साथ लाभेल.प्रवास लाभदायक होतील. व्यापारात मोठे आर्थिक लाभ होतील.

सिंह

शासकीय सेवेत नोकरदारासाठी सफलदायक दिवस आहे. स्पर्धा परिक्षेत यश मिळेल. कर्मावर विश्वास ठेवा. आपल्या कार्यक्षेत्रात धाडसी निर्णय घ्याल. आशाजनक वातावरण निर्माण होईल. भांवडाकडून मदत मिळेल. व्यापारात तुम्हाला भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल. लेखक कला क्षेत्रातील व्यक्तींना शासकीय मानसन्मान मिळेल. आजचा दिवस ठरविल्याप्रमाणे कामे पार पाडण्यात उपयुक्त असा आहे. आर्थिक लाभ होतील. उन्नतीकारक दिवस आहे. एकंदरित शुभ फलदायी दिवस राहील

कन्या

रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. दुरचे प्रवास घडतील. परदेशगमनाचे योग आहेत. धार्मिक सामाजिक कार्यात सक्रियतेने भाग घ्याल. मित्रमंडळीचे सहकार्य लाभेल. प्रेमप्रकरणात यश येईल.स्वतःच्या मनाने विचाराअंतीच निर्णय घ्या. आहारावर नियंत्रण ठेवा. साहित्यिक संपादन या बौद्धिक अधिष्ठान असणाऱ्या कार्यक्षेत्रात आपल्या कार्याचा विस्तार वाढेल. मानधनात वाढ होईल. नवनवीन कल्पना सुचतील. आर्थिक बाबतीत वाढ होईल.

तुला

कामाच्या ठिकाणी ताणतणात्मक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यापारात भागीदारासोबत वादविवाद टाळा. कलह होण्याची शक्यता राहिल. मोठी आर्थिक मोठी आर्थिक हानी फसवणुक होण्याचे योग आहे. लक्ष्मीची अवकृपा रहिल. छोट्याशा कारणाने मन दुखावेल. प्रकृतीच्या समस्या उद्भभवतील. शारीरिक दृष्टीकोनातून मधुमेह पोटाचे विकार असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्या. जोडीदाराशी स्नेहपुर्वक वागा. आर्थिक हानीची शक्यता वाटते. चिंता वाढविणारा दिवस असुन मनावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी.

वृश्चिक

प्रमोशन मिळेल. वरिष्ठाकडून सहकार्य लाभेल. व्यावसायिक भागीदारासोबत नवीन व्यापार प्रारंभास दिनमान अनुकुल राहिल. व्यवहारचातुर्य संयमी भूमिका घेतली तर मोठा आर्थिक लाभ होईल. कामाप्रती सजग रहा. मित्रांकडून आयकारक प्रस्ताव येतील. कुटुंबात मंगलकार्याची रुपरेखा नियोजन कराल. पत्नीचा सल्ला फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडणार आहे. सर्वच स्तरातील नातेसंबंधात स्नेह निर्माण होईल. कुटुंबातील वातावरण स्नेहपूर्वक राहिल.

धनु

मनावर संयम ठेवून रहा. मानसिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गानी काळजी पूर्वक व्यवहार करावेत. सुखचैनीच्या वस्तूंवरील खर्च वाढणार आहे. नोकरीत वरिष्ठांशी वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. शारिरिक त्रास जुना आजार उद्भभवण्याची शक्यता आहे. मानसिक दृष्टीकोनातून क्लेश उत्पन्न करणार दिनमान आहे. कुटुंबातील वरिष्ठ सदस्याच्या आरोग्याची काळजी घ्या. वैद्यकिय उपचारा वर खर्च होण्याची शक्यता आहे.

मकर

नोकरीत वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल. रोजगारात कार्यक्षमतेमध्ये वाढ होईल. व्यापारात आपली प्रतिमा उंचावेल. गृहसौख्य उत्तम आहे. प्रेमप्रकरणात संबंध दृढ होतील. विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. स्पर्धापरिक्षेत यश मिळेल. मुलांच्या प्रगतीने मन समाधानी राहिल. व्यावसायिकांना अपेक्षित यश लाभेल. कला क्षेत्रातील मनोरंजन विश्वातील मंडळीना उत्तम दिवस आहे. विद्यार्थ्यानी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे. कुटुंबांवर वाहन घर खरेदीस अनुकूल दिवस आहे.

कुंभ

कामातून मिळणाऱ्या लाभात मन समाधानी राहिल. सर्वच क्षेत्रातील जातकांना धनलाभाचा दिवस आहे. व्यापारात नवीन योजनेचा प्रारंभ करा वक्तृत्वाचा प्रभाव राहील. समाजात आपली मानसन्मान प्रतिष्ठा वाढेल. आकस्मिक लाभाचा योग आहे. बौद्धिक आणि शैक्षणिक कार्यात मान सन्मान मिळेल. स्थावर मालमत्तेची विक्रि करताना घाईगडबड करू नका. दुसऱ्याच्या कामात मात्र हस्तक्षेप करू नका.

मीन

आत्मविश्वास वाढीस लागणार आहे. आर्थिक वृद्धी होईल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. चंद्रबल उत्तम आहे. नोकरीत आत्मविश्वास द्विगुणित करणारा दिवस ठरेल. मनातील संभ्रम दुर करून आत्मविश्वासाने सामोरे जा. यश निश्चित लाभेल. बौद्धिक क्षेत्रात काम करण्याऱ्या व्यक्तींचा मानसन्मान होईल. व्यवसायात कार्यक्षेत्रात विस्तार होईल. आजचा दिवसआपल्यास अत्यंत शुभ फलदायी ठरेल. व्यापारात आकस्मिक धनलाभ होईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.