Astrology: 21 ऑगस्टला बुध ग्रहाचे गोचर, या तीन राशींवर होणार प्रभाव
21 ऑगस्ट 2022 रोजी 1 वाजून 55 मिनिटांनी बुध ग्रह आपल्या कन्या राशीत प्रवेश करणार आहे. पण या गोचर काळात बुध ग्रह गुरुपासून सातव्या स्थानात असणार आहे. त्यामुळे गुरु-बुध यांच्यात समसप्तक योग तयार होणार आहे. त्यामुळे तीन राशींना काळजी घ्यावी लागणार आहे. चला तर जाणून घेऊयात या तीन राशी कोणत्या आहेत.
जोतिषशास्त्रात Astrology ग्रहांच्या राशी परिवर्तनाला (Planet Transit) विशेष महत्त्व आहे. प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत परिभ्रमण करतो याला जोतिषीय भाषेत गोचर असे म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार मेष ते मीन अशा 12 राशीत नऊ ग्रह ठराविक कालावधीनंतर गोचर करतात. त्यामुळे राशींवर त्या त्या ग्रहाचे शुभ अशुभ परिणाम होत असतात. कधी कधी एकाच राशीत दोन किंवा त्यापेक्षा अधिक ग्रह एकत्र येतात. त्यामुळे काही योग तयार होतात. 21 ऑगस्ट 2022 रोजी 1 वाजून 55 मिनिटांनी बुध ग्रह आपल्या कन्या राशीत प्रवेश करणार आहे. पण या गोचर काळात बुध ग्रह गुरुपासून सातव्या स्थानात असणार आहे. त्यामुळे गुरु-बुध यांच्यात समसप्तक योग तयार होणार आहे. त्यामुळे तीन राशींना काळजी घ्यावी लागणार आहे. चला तर जाणून घेऊयात या तीन राशी कोणत्या आहेत.
- मेष : बुध ग्रहाने राशी बदल केल्यानंतर मेष राशीवरही वाईट परिणाम होईल. मुलांच्या शिक्षणाची चिंता सतावेल. मुलांचं मन अभ्यासातून भरकटू शकते, त्यामुळे तुमचा मानसिक ताण वाढेल. मुले वाईट संगतीत पडण्याचीही शक्यता असते. शक्य असल्यास या काळात मुलांना जास्त वेळ द्या आणि त्यांना अभ्यासासाठी प्रवृत्त करा.
- कुंभ : बुध ग्रहाच्या या राशी बदलामुळे आरोग्याची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे बाहेरचे अन्न खाणे टाळावे. तसेच आरोग्याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर या योगामुळे एखादी दुर्घटना होण्याची शक्यता असते. त्यामुळे वाहन चालवताना काळजी घ्या आणि वेग नियंत्रणात ठेवा. कोणाशीही भांडणे टाळा आणि सौम्य वागण्याचा प्रयत्न करा.
- तूळ : तूळ राशीच्या लोकांना या संक्रमण काळात आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. खर्च उत्पन्नापेक्षा जास्त असेल आणि अनेक ठिकाणी अनावश्यक खर्च करावा लागणार आहे. कुटुंबातील सदस्यांच्या तब्येतीत चढ-उतार होतील. तुम्हाला न्यायालयीन प्रकरणांमध्ये अडकावे लागू शकते.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)