Astrology : कन्या राशीत जुळून येतोय त्रिग्रही योग, या राशीच्या लोकांना होणार लाभ

जोतिषशास्त्रात ग्रहांनी विशेष महत्त्व आहे. जोतिषशास्त्रानुसार जीवनात घडणाऱ्या बदलांना ग्रहांची स्थिती जबाबदार असते. जेत्या काही दिवसांत त्रिग्रही योग जुळून येतोय त्रिग्रही योग म्हणजे तीन शुभ ग्रह एकात राशीत येणार आहे. हा शुभ संयोग काही राशीच्या लोकांना शुभ फळ देणार आहे. यामध्ये कोणत्या राशीच्या जातकांचा समावेश आहे ते जाणून घेऊया.

Astrology : कन्या राशीत जुळून येतोय त्रिग्रही योग, या राशीच्या लोकांना होणार लाभ
राशी भविष्य Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 10, 2023 | 7:23 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology 2023) नवग्रहांचे विशेष महत्त्व आहे. प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर आपली राशी बदलतो. याला ग्रहांचे संक्रमण असे म्हणतात. ग्रहांचे संक्रमण 12 राशींवर परिणाम करते. नवग्रहात शनि आणि राहू एकाच राशीत 18 महिने राहतात. चंद्र आता बुधाच्या कन्या राशीत आहे. धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी हा ग्रह तूळ राशीत प्रवेश करेल. अशा स्थितीत केतू आणि शुक्र आधीच कन्या राशीत आहेत. यामुळे कन्या राशीमध्ये त्रिग्रही योग तयार होईल. काही राशींसाठी हा योग लाभदायक ठरेल. या लोकांच्या जीवनात समृद्धी येईल. जोतिषी पराग कुळकर्णी यांच्याकडून जाणून घेऊया कोणत्या राशींना त्रिग्रही योगाचा फायदा होईल.

कन्या

शुक्र, केतू आणि चंद्र कन्या राशीत आहेत. आता चंद्राच्या आगमनाने त्रिग्रही योग तयार होत आहे. या राशीच्या लोकांसाठी हा योग खूप फलदायी ठरेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. संपत्ती वाढल्याने व्यापार दुप्पट होईल. तसेच वैवाहिक जीवनात आनंद राहील. जीवनातील सततचा तणाव दूर होईल. गुंतवणुकीसाठी हा काळ अतिशय शुभ आहे. सोन्यात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. व्यापारात घेतलेला निरणय फायद्याचा ठरेल.  जोडीदारासोबतचे मतभेद दूर होतील.

मकर

शुक्र आणि केतू मकर राशीतील नवव्या घरात संयोगी आहेत. या राशीच्या लोकांना त्रिग्रही योगाचा फायदा होईल. प्रत्येक कामात यश मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. वाहन खरेदीचे स्वप्न साकार होईल. तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण होतील. विवाह इच्छुकांचे लग्नाचे योग जुळून येईल. ज्यांचे कोर्ट कचेरीचे प्रकरण सुरू आहे त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

वृश्चिक

गेल्या काही दिवसांपासून करत असलेल्या प्रयत्नांना यश येणार आहे. रोजगाराच्या नविन संधी उपलब्ध होतील. जुना अनुभव नविन कामात उपयोगी येईल. मिळालेल्या संधीचे सोने कराल. दूरदृष्टी ठेवून घेतलेला निर्णय फायद्याचा ठरेल. आर्थिक व्याव्हार करताना डोळसपणे करावा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?.
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी.