Astrology: शुक्राच्या कृपेने बनतोय त्रिकोणी राजयोग, या राशीच्या लोकांना मिळणार सुख आणि संपत्ती
धन आणि वैभवाचा ग्रह शुक्र त्रिकोणी राजयोग तयार करत आहे. या राजयोगामुळे तीन राशींना सर्वाधिक फायदा होणार आहे.
मुंबई, संपत्ती, वैभव आणि ऐशोआरामाचा कारक शुक्र ग्रह 18 ऑक्टोबर रोजी स्वतःच्या राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राचे संक्रमण 3 राशींच्या कुंडलीत राजयोग (Rajyoga) निर्माण करत आहे. यामुळे या राशीच्या लोकांसाठी खूप शुभ योग जुळून येतील. या तीन राशीच्या लोकांना धनलाभ (Dhanlabha) तर होईलच शिवाय. उत्पन्नाचे नावे मार्गही खुले होतील. त्याचबरोबर प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवनातही आनंद परम येईल. याशिवाय जीवनात सुख-समृद्धी वाढेल. चला जाणून घेऊया शुक्राच्या संक्रमणामुळे कोणत्या राशींना फायदा होणार आहे.
- कन्या- शुक्राच्या संक्रमणाने तयार होणारा त्रिकोणी राज योग कन्या राशीच्या लोकांना खूप धनलाभ करणार आहे. नोकरदार लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. व्यावसायिक एखाद्या मोठ्या करारावर स्वाक्षरी करू शकतात. वाहन सुख मिळेल. जोडीदाराशी संबंध सुधारतील. धार्मिक प्रवासाला जाता येईल. ऑफिसमध्ये तुमच्या कामावर अधिकारी खुश राहतील.
- मकर- शुक्राच्या राशीतील बदलामुळे मकर राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळतील. जे बेरोजगार आहेत त्यांना नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. या राशीच्या करिअरसाठी हा काळ खूप चांगला जाणार आहे. धनलाभ होऊ शकतो. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. अविवाहितांना जोडीदार मिळू शकतो.
- कुंभ- शुक्राच्या या बदलामुळे कुंभ राशीच्या लोकांसाठी अनेक सुखाचे प्रसंग येणार आहेत. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. सहलीला जावे लागेल. या राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ राहील. गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो. मान-प्रतिष्ठेत वाढ होईल. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर राहील.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
हे सुद्धा वाचा