Astrology : मेष राशीत होणार शुक्राचे भ्रमण, पाच राशींवर होणार धनवर्षा

या राशीच्या लोकांसाठीही शुक्र शुभ परिणाम देईल. नवीन लोकांशी तुमचा संपर्क वाढेल, ज्याचा दीर्घकाळ फायदा होईल.

Astrology :  मेष राशीत होणार शुक्राचे भ्रमण, पाच राशींवर होणार धनवर्षा
ज्योतीषास्त्रImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Mar 03, 2023 | 8:24 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) शुक्र हा सर्वात शुभ ग्रह मानला जातो. शुक्र अनुकूल असल्यास जीवनात प्रेम आणि भौतिक सुख प्राप्त होते. दुसरीकडे, जेव्हा शुक्र कमजोर असतो तेव्हा अपयश येते. शुक्राचे संक्रमण सर्व राशींवर परिणाम करते. 12 मार्च रोजी शुक्र मेष राशीत प्रवेश करणार आहे, ज्याची वेळ सकाळी 08.13 असेल. 15 फेब्रुवारीला शुक्र मीन राशीत प्रवेश केला होता. राहू आधीच मेष राशीत आहे. होळीनंतर जेव्हा शुक्र मेष राशीत प्रवेश करेल, तेव्हा अनेक राशींना फायदा होईल आणि काही राशींवरही नकारात्मक परिणाम होईल. चला जाणून घेऊया होळीनंतर शुक्राच्या संक्रमणामुळे कोणत्या राशींना फायदा होणार आहे.

1. मेष

शुक्राचे हे संक्रमण मेष राशीतच होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना भरपूर लाभ मिळतील. तुमच्या व्यक्तिमत्वात बदल होऊ शकतो. मित्रपरिवाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. प्रेमसंबंधही मजबूत राहतील. विवाहितांना जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ होईल. व्यवसायातही नफा मिळू शकतो.

2. मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठीही शुक्र शुभ परिणाम देईल. नवीन लोकांशी तुमचा संपर्क वाढेल, ज्यामुळे मिथुन राशीच्या लोकांना दीर्घकाळ फायदा होईल. मुलांकडूनही काही चांगली बातमी मिळू शकते. शुक्राचे हे संक्रमण विद्यार्थ्यांसाठी अद्भूत असणार आहे. या दरम्यान, तुम्हाला शारीरिक सुखांचा पूर्ण आनंद मिळण्याची शक्यता आहे. शिक्षणात चांगली कामगिरी करू शकाल.

हे सुद्धा वाचा

3. सिंह

सिंह राशीच्या लोकांना शुक्र संक्रमणाचा चांगला फायदा होईल. विवाहितांसाठी हे संक्रमण लाभदायक ठरणार आहे. या वेळी जे नवीन काम सुरू करणार आहेत, त्यांच्यासाठीही हा काळ चांगला राहील. परदेश दौऱ्याची शक्यता निर्माण झाली आहे. नोकरीच्या शोधात फिरणाऱ्या लोकांना चांगली नोकरी मिळू शकते. सिंह राशीच्या लोकांना लहान भावंडांचे पूर्ण सहकार्य मिळेल.

4. धनु

शुक्राचे हे संक्रमण धनु राशीच्या लोकांसाठी खूप शुभ सिद्ध होईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप चांगला असणार आहे. विवाहित लोकांना यावेळी चांगली बातमी मिळू शकते. जुना वाद चालू असेल तर तोही संपुष्टात येईल. पैशाच्या समस्याही संपतील. वेगवेगळ्या मार्गाने पैसा मिळवण्यात यश मिळेल. नोकरदार लोकांना या काळात पदोन्नती मिळू शकते.

5. मीन

मीन राशीच्या लोकांना शुक्र आशीर्वाद देईल. या दरम्यान तुम्ही पैसे वाचवू शकाल. भागीदारीच्या कामात यश मिळू शकते. सासरच्या मंडळींशी तुमचे संबंध चांगले राहतील. तुम्ही लोकांना तुमच्याकडे आकर्षित करू शकाल. मीन राशीचे लोक त्यांच्या बोलण्याने लोकांना आकर्षित करतील. आर्थिक बाबतीत समजूतदारपणाने पुढे जाल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.