Astrology: कामात यश आणि ग्रहांच्या शुभ प्रभावासाठी वारानुसार परिधान करा ‘या’ रंगाचे कपडे

ज्योतिषशास्त्रानुसार, रंगांचा तुमच्या जीवनावरही मोठा प्रभाव पडतो. अशा स्थितीत दिवसानुसार रंगांचे कपडे परिधान केल्याने कुंडलीतील ग्रह मजबूत होतातच शिवाय तुमच्या जीवनात सकारात्मकता वाढते.

Astrology: कामात यश आणि ग्रहांच्या शुभ प्रभावासाठी वारानुसार परिधान करा 'या' रंगाचे कपडे
Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 31, 2022 | 5:42 AM

ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) तुम्ही जे कपडे घालता ते देखील ग्रहांशी संबंधित असतात.  नियमितपणे स्वच्छ कपडे परिधान केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा राहते. असे मानले जाते की जर कपड्यांचे रंग वारानुसार (Colours by day)  निवडले गेले तर त्यामुळे कार्यांमध्ये यश मिळण्याची शक्यता वाढते. सर्व नवग्रहांशी संबंधित विविध रंग हिंदू धर्मग्रंथात सांगण्यात आले आहेत. दुसरीकडे, ज्योतिषशास्त्रानुसार, रंगांचा तुमच्या जीवनावरही मोठा प्रभाव पडतो. अशा स्थितीत दिवसानुसार रंगांचे कपडे परिधान केल्याने कुंडलीतील ग्रह मजबूत होतातच शिवाय तुमच्या जीवनात सकारात्मकता वाढते. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते.

  1. रविवार- ज्योतिषशास्त्रानुसार रविवार हा ग्रहांचा राजा सूर्य देवाला समर्पित मानला जातो. अशा स्थितीत रविवारी लाल, सोनेरी, केशरी किंवा गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यास व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो.
  2. सोमवार- सोमवार हा चंद्रदेव आणि भोलेनाथ यांना समर्पित आहे, अशा स्थितीत ग्रहांच्या शुभ आणि सुख-समृद्धीसाठी या दिवशी चांदीचे, पांढरे किंवा क्रीम रंगाचे कपडे घालावेत.
  3. मंगळवार- हिंदू धर्मात मंगळवार हा हनुमानाच्या पूजेसाठी विशेष मानला जातो. या दिवशी भगवा, केशरी या रंगांचे कपडे परिधान केल्याने व्यक्तीमध्ये धैर्य आणि ऊर्जा वाढते.
  4. बुधवार- ज्योतिषशास्त्रानुसार बुधवारी प्रथम पूजनीय गणपतीची पूजा केल्याने कुंडलीतील बुध ग्रह बलवान होतो. तसेच बुधवारी हिरवे कपडे परिधान केल्याने बुद्धी, समृद्धी आणि ज्ञानाची प्राप्ती होते.
  5. हे सुद्धा वाचा
  6. गुरुवार- गुरुवार हा भगवान बृहस्पति आणि भगवान विष्णूचा दिवस मानला जातो. असे मानले जाते की, गुरुवारी पिवळे आणि केशरी कपडे परिधान केल्याने कुंडलीतील गुरु ग्रह बलवान होतो आणि जीवनात समृद्धी, संतती आणि वैवाहिक सुख मिळते.
  7. शुक्रवार- लक्ष्मी आणि शुक्र देवाला समर्पित या दिवशी गुलाबी लाल पांढरे वस्त्र परिधान केल्यास जीवनात सुख संपत्तीची प्राप्ती होते.
  8. शनिवार- शनिवार हा दिवस न्यायाची देवता शनिदेवाला समर्पित मानला जातो, या दिवशी गडद निळे, काळे, तपकिरी, जांभळे रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.