Astrology: भाग्यवान लोकांच्या हातावर असते अशा प्रकारची ब्रेसलेट लाईन, काय असतात याचे फायदे?
तळहाताच्या ब्रेसलेट रेषेबद्दल आपण जाणून घेणार आहोत. जोतीषशास्त्राच्या दृष्टीने याचे काय महत्व आहे याबद्दल जाणून घेऊया.
मुंबई, हस्तरेखाशास्त्रामध्ये हस्तरेषा (Astrology) आणि चिन्हे याद्वारे माणसाचे वर्तन, आचरण आणि भविष्य वर्तवले जाते. याला कुठलाही वैज्ञानिक आधार नसला तरी बऱ्याच गोष्टी मोठ्या प्रमाणात खऱ्या ठरतात. प्रत्येक व्यक्तीला आपले भविष्य, नशीब, करिअर, नोकरी याविषयी जाणून घेण्याची ओढ असते. आज तळहाताच्या ब्रेसलेट रेषेबद्दल (bracelet lines) आपण जाणून घेणार आहोत. जोतीषशास्त्राच्या दृष्टीने याचे काय महत्व आहे याबद्दल जाणून घेऊया.
वय
हाताच्या मनगटावरील रेषांना ब्रेसलेट रेषा म्हणतात. यावरून व्यक्तीच्या वयाची माहिती मिळते. हस्तरेषाशास्त्रानुसार, ब्रेसलेट रेषा जितकी दूर आहे तितकेच आयुष्यदेखील जास्त असते.
समृद्धी
हस्तरेषाशास्त्रानुसार तळहातावर तीन प्रकारच्या ब्रेसलेट रेषा असतात. जर एखाद्या व्यक्तीच्या तळहातावर तीन ब्रेसलेट रेषा असतील तर त्यांचे जिवन संमृध्दीने भरलेले असते. त्याचबरोबर तळहातावर चार ब्रेसलेट रेषा असणेदेखील शुभ असते. यामुळे माणसाचे नशीब उघडपणे साथ देते.
आरोग्य
मनगटावरील पहिली ब्रेसलेट लाइन एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याबद्दल सांगते. जर ही रेषा सरळ आणि स्पष्ट असेल तर व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते. अशा लोकांपासून आजार दूर राहतात आणि त्यांना चांगले आरोग्य लाभते.
नशीबवान
समुद्र शास्त्रानुसार जर ब्रेसलेटच्या चारही रेषा स्पष्ट आणि सरळ असतील तर अशा व्यक्तीला खूप भाग्यवान मानले जाते. त्याला आयुष्यभर कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. त्याला दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य मिळते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)