Astrology: आजचा दिवस उत्साहाने भरलेला, या राशीच्या लोकांना मिळणार परिश्रमाचे फळ

ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते.

Astrology: आजचा दिवस उत्साहाने भरलेला, या राशीच्या लोकांना मिळणार परिश्रमाचे फळ
जोतिषशास्त्र Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 01, 2022 | 6:45 AM

Astrology:  ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

  1. मेष- आज व्यवसाय करणाऱ्या लोकांनी कडूपणाचे गोड्यात रूपांतर करण्याची कला आत्मसात करणे योग्य ठरेल. एखादया सरकारी योजनेचा लाभ मिळू शकतो.  रखडलेले काम तुम्हाला अडचणीत आणण्याची शक्यता आहे, जे तुम्हाला त्वरित पूर्ण करण्याचा  प्रयत्न करावा लागेल. आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन घराबाहेर पडल्यास तुमच्या अनेक समस्या दूर होतील. भावंडांसोबत सुरू असलेला संघर्ष तुम्हाला संपवावा लागेल, अन्यथा परस्पर संबंधात तेढ निर्माण होऊ शकतो.
  2. वृषभ-   आजचा दिवस तुमच्यासाठी खूप फलदायी असणार आहे. तुमच्या मनात चांगले विचार येतील, ज्यामुळे तुम्ही तुमचा अधिकाधिक वेळ इतरांची सेवा करण्यात घालवाल. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत पार्टी देखील करू शकता. लव्ह लाईफ जगणारे लोक त्यांच्या जोडीदाराला बाहेर फिरायला घेऊन जातील, त्यामुळे तुमच्या आर्थिक ताण पडू शकतो. तुमचे काही हितशत्रू तुमचा हेवा करतील.
  3. मिथुन- आज तुम्ही उत्साहाने भरलेले असाल. परीक्षेत यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करावे लागतील. राजकारणात काम करणाऱ्या लोकांना एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जायचे असेल, तर त्यांना काही काळ वाट पाहावी लागेल. तुमची जुनी इच्छा पूर्ण होऊ शकते, त्यानंतर तुम्ही धार्मिक स्थळाच्या यात्रेला जाऊ शकता. परिश्रमाचे फळ मिळेल.
  4. कर्क- लव्ह लाईफ जगणाऱ्या लोकांच्या आयुष्यात आजचा दिवस चढ उतार आणेल. तुमची समजूतदारपणा दाखवून तुम्ही या परिस्थितीतून सहज बाहेर पडू शकाल. तुम्ही नोकरी क्षेत्रात काही बदल करण्याचा विचार करत असाल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. सरकारी नोकरीत काम करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळू शकते, त्यामुळे त्यांना घरापासून दूर जावे लागेल.
  5. सिंह- व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आज दिवसाची सुरुवात चांगली होईल, पण दुपारनंतर फारसा फायदा होणार नाही. ज्यांना मांसाहार आणि दारूचे व्यसन आहे, आज ते सोडण्याचा विचारही करतील. तुमच्या कुटुंबातील लहान मुलांसोबत मजा करून तुम्ही तुमचा ताण थोडा कमी करू शकाल. तुमचा तुमच्या सासरच्या लोकांशी वाद होऊ शकतो, ज्यानंतर तुमच्या जोडीदारासोबत वाद होतील.
  6. कन्या- आज तुमच्यामध्ये बोलण्याची जी कला आहे, त्यातून तुम्हाला अनेक गोष्टी मिळू शकतात. नशिबाच्या मदतीने तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता. तुमच्या मनात काही नवीन कल्पना येतील, ज्याचा व्यवसाय करून तुम्ही नफा कमवू शकाल. तुमच्या नातेवाईकांच्या घरी मेजवानीसाठी जाण्याची संधी मिळेल. तुम्हाला सर्व बाजूंनी चांगली बातमी ऐकायला मिळेल. जर तुम्ही व्यवसायाशी संबंधित सहलीला गेलात तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
  7. तूळ-  आजचा दिवस तुमच्यासाठी खर्चाने भरलेला असेल. तुम्ही तुमच्या खर्चाबाबत चिंतेत राहाल. व्यवसायात अपेक्षित लाभ न मिळाल्याने काळजी असेल. कौटुंबिक वाद आज संपुष्टात येतील. कुटुंबातील सदस्यांसोबत थोडा वेळ एकांतात घालवाल. हितशत्रू नोकरीत असलेल्या लोकांवर वर्चस्व गाजवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील, त्यांना अटकाव करावा  लागेल.
  8. वृश्चिक- कुटुंबात मंगल कार्यक्रमाचे आयोजन करता येईल. धनसंचय करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. गोड बोलून तुम्ही लोकांची मने जिंकू शकाल. अधिकारीही कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा करताना दिसतील. तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही मुलाच्या भविष्याशी संबंधित काही योजनांवर चर्चा करू शकता. तुम्हाला काही गुप्त पैसे मिळू शकतात. वडिलांशी तुमचा काही वाद असेल तर त्यामध्ये गप्प राहणेच योग्य.
  9. धनु- व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस कठीण जाईल, परंतु भावांच्या मदतीने तुम्ही अडचणीतून मुक्त होऊ शकता. कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस चांगला नाही, त्यामुळे निर्णय समोर ढकला. तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील, परंतु तुमच्या काही कटू बोलण्यामुळे तुमच्या मित्रांसोबत मतभेद निर्माण होऊ शकतात, त्यामुळे तुम्ही सावधगिरी बाळगावी. इतरांना सल्ले देण्यापासून दूर राहावे लागेल. आईला अचानक काही आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
  10. मकर- आजचा दिवस तुमच्यासाठी कठीण असू शकतो. तुम्हाला कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागत असेल, तर त्यातही संयम बाळगणे तुमच्यासाठी चांगले राहील. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही कठीण कामही पूर्ण मेहनतीने कराल. व्यवसाय करणाऱ्या लोकांचे मोठे नुकसान होऊ शकते, त्यामुळे काळजी घ्या. इच्छा पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला धार्मिक प्रवासाला जावे लागेल. तुमच्या जोडीदाराच्या सहकार्याने आनंदी व्हाल.
  11. कुंभ-  नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. त्यांच्या मनाप्रमाणे काम मिळाल्याने ते अधिक आनंदी होतील.  तुमच्या आजूबाजूच्या लोकांकडून गोड बोलून तुमचे काम सहज करून घेऊ शकाल, ज्यांना नोकरीसोबतच कोणतेही ऑनलाइन काम करायचे आहे, ते त्यात यशस्वीही होतील.
  12. मीन-  घरातील सदस्यांमध्ये वादविवाद झाला तर दोन्ही बाजू ऐकून घेऊनच निर्णय घ्या.आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला असणार आहे. काही चांगल्या लोकांशी संपर्क प्रस्थापित कराल. मोठी गुंतवणूक करणे टाळावे. विद्यार्थ्यांना त्यांच्या कमकुवत विषयांवर मेहनत करूनच यश मिळेल. आज तुम्हाला काही जुन्या जबाबदाऱ्यांबद्दल काळजी वाटेल.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला.
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्..
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्...