August 2023: गजकेसरी आणि त्रिकोण राजयोगामुळे चार राशींचं नशिब फळफळणार, कोणत्या राशी ते जाणून घ्या

ऑगस्ट महिना सुरु झाला असून ग्रह ताऱ्यांची आपल्या काय कृपा असेल याचा अंदाज घेतला जात आहे. या महिन्यात दोन शुभ योग असून चार राशींना फायदा होईल.

August 2023: गजकेसरी आणि त्रिकोण राजयोगामुळे चार राशींचं नशिब फळफळणार, कोणत्या राशी ते जाणून घ्या
ऑगस्ट महिन्यात ग्रहांच्या स्थितीमुळे दोन शुभ योग, चार राशींना होणार फायदा
Follow us
| Updated on: Aug 02, 2023 | 8:02 PM

मुंबई : ऑगस्ट महिन्यात ग्रहांच्या स्थितीमुळे दोन शुभ योगांची स्थिती तयार होत आहे. ग्रहांची स्थिती आणि स्थान यावर शुभ अशुभ योग तयार होत असतात. कोणत्या स्थानात आहे आणि काय फळ देणार यावरून राशी ठरवल्यात. चंद्राचा गोचर वेग अधिक असल्याने गजकेसरी योग जुळून येतो. या महिन्यात चार वेळा गजकेसरी योग आणि त्रिकोण राजयोग तयार होणार आहे. ग्रहांच्या शुभ स्थितीचा राशीचक्रावर सकारात्मक परिणाम होईल. त्रिकोण राजयोगामुळे कठीण काळातही व्यक्तीला उत्तम साथ मिळते आणि जीवनशैली बदलून जाईल. ग्रहांच्या या स्थितीचा जातकांना फायदा होणार आहे.

चार राशीच्या जातकांना होईल फायदा

मेष : शुभ योगामुळे या राशीच्या जातकांना ग्रहांची उत्तम साथ मिळणार आहे. आर्थिक कोंडी या काळात फुटेल. नवीन आर्थिक स्रोत या काळात तयार होतील. गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम राहील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या जातकांना विशेष लाभ मिळेल. आपल्या हातून काही सत्कार्य घडतील. समाजात मानसन्मान वाढेल.

कर्क : गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं या काळात पूर्ण होतील. पण काही कठीण प्रसंगही या काळात ओढावू शकतात. पण ग्रहांची स्थिती उत्तम असल्याने संकट पेलू शकाल. वडिलोपार्जित जमिनीचा योग्यरित्या सांभाळ करा. ती विकण्याच्या भानगडीत पडू नका. आरोग्यविषयक तक्रारी या काळात दूर होतील.

तूळ : कौटुंबिक वातावरण या काळात एकदम मस्त राहील. कौटुंबिक व्यवसायात प्रगती होताना दिसेल. काही नवीन करार निश्चित होतील. टीव्ही, चित्रपटसृष्टीशी निगडीत लोकांना चांगली कामं हाती पडतील. वैवाहिक जीवनही चांगलं असेल. जोडीदाराकडून उत्तम साथ मिळेल. केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल.

मकर : या काळात वाहन खरेदीचा योग जुळून येईल असं ग्रहमान आहे. आईच्या माहेरातून पैसा येऊ शकतो. संपत्ती किंवा शेअर बाजारात गुंतवणूक करू करण्यासाठी योग्य वेळ असेल. वाद होईल असं कोणासोबत वागू नका. शेजारधर्म पाळण्याच्या हातचं सोडून देऊ नका. अन्यथा मोठा फटका बसू शकतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.