Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baba Vanga Prediction : ना महापूर, ना भूकंप, ना युद्ध जगावर येणार दुसरंच मोठं महासंकट; बाबा वेंगा यांचं थरकाप उडवणार भाकीत

बाबा वेंगा यांनी केलेली अनेक भाकीत खरी ठरली आहेत, असा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जातो. बाबा वेंगा यांचं आता आणखी एक मोठं भाकीत समोर आलं आहे.

Baba Vanga Prediction : ना महापूर, ना भूकंप, ना युद्ध जगावर येणार दुसरंच मोठं महासंकट; बाबा वेंगा यांचं थरकाप उडवणार भाकीत
Follow us
| Updated on: Apr 06, 2025 | 6:23 PM

प्रत्येकाला आपलं भविष्य जाणून घेण्याची इच्छा असते. आपलं भविष्य कसं असणार? भविष्यात आपल्यासोबत कोणत्या घटना घडणार आहेत? आपल्यासोबत काय होऊ शकतं हे जाणून घेण्यासाठी आपण एखाद्या ज्योतिषाकडे जातो. तो आपल्या पुढच्या आयुष्याबद्दल भविष्यवाणी करत असतो. दरम्यान जेव्हा-जेव्हा जगप्रसिद्ध भविष्यवेत्त्यांचा विषय निघतो, त्यामध्ये आवर्जून एका नावाची चर्चा होते, ती म्हणजे बाबा वेंगा यांच्या नावाची. बाबा वेंगा यांचा जन्म बग्लेरीयामध्ये झाला. असं मानलं जातं की एका वादळात सापडल्यामुळे बाबा वेंगा यांनी आपल्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गमावली होती. त्यानंतर त्यांना दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली. त्यानंतर बाबा वेंगा यांनी केलेली अनेक भाकीतं खरी ठरली आहेत, असा दावा केला जातो.

बाबा वेंगा यांनी केलेली अनेक भाकीत खरी ठरली आहेत, असा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जातो. बाबा वेंगा यांनी अमेरिकेवर होणाऱ्या हल्ल्याबाबत आधीच भाकीत केलं होतं. ते खरं ठरलं असं मानलं जातं. हिटलरचा मृत्यू, इंग्लंडच्या रानीचा मृत्यू अशा अनेक गोष्टींबाबत बाबा वेंगा यांनी आधीच भविष्यवाणी केली होती. दरम्यान बाब वेंगा यांनी 2025 बाबात देखील काही भाकीतं केली आहेत. ती आता खरी ठरत असल्याचा दावा केला जात आहे. 2025 मध्ये जगाच्या अंताला सुरुवात होईल, अनेक देशांमध्ये शक्तिशाली महाभूकंप होतील, महापूर येतील, आजार पसरतील, भीषण युद्ध देखील होऊ शकतं असं भाकीत 2025 संदर्भात बाबा वेंगा यांनी वर्तवलं होतं.

मात्र आता त्यांचं आणखी एक नवं भाकीत समोर आलं आहे, त्यामुळे चिंता वाढली आहे. बाबा वेंगा यांनी हे भाकीत सायबर क्राइम संदर्भात केलं आहे. तेव्हा एआय तंत्रज्ञान अस्तित्वात नव्हतं. मात्र या संदर्भात एक मिळतं -जुळतं भाकीत तेव्हा बाबा वेंगा यांनी केलं आहे. पुढील काळात एक असं तंत्रज्ञान विकसीत होईल, त्यामुळे मानवाचे सर्वच कामे सोपे होतील, मात्र हे तत्रंज्ञान मानवासाठी खूप घातक देखील ठरणार आहे. सायबर क्राइमचा धोका इतका वाढेल की हे संकट जगात धुमाकूळ घालेल असं बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे. त्यांनी हे भाकीत इटरनेट संदर्भात केलं असावं असा अंदाज वर्तवला जात आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.