महादेवाची पूजा करतांना हे नियम अवश्य पाळा, सदैव राहिल भोलेनाथाची कृपादृष्टी
असे मानले जाते की श्रावण महिन्यात भोलेनाथ भक्तांवर कृपा करतात. त्याचबरोबर भगवान शंकराची पूजा करताना काही वास्तु नियमांची काळजी घेणे आवश्यक आहे.
मुंबई : श्रावण महिना (Shrawan 2023) 18 जूलैपासून सुरू होणार आहे. यावेळी श्रावण 59 दिवसांचा असणार आहे. सावन महिन्यात भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. यासोबतच भोलेनाथाची पूजाही केली जाते. असे मानले जाते की श्रावण महिन्यात भोलेनाथ भक्तांवर कृपा करतात. त्याचबरोबर भगवान शंकराची पूजा करताना काही वास्तु नियमांची काळजी घेणे आवश्यक आहे. भगवान शंकराच्या पूजेमध्ये वास्तुशी संबंधित चुका करू नयेत. असे केल्याने पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही. ते नियम काय आहेत जाणून घेऊया.
या दिशेला असावे शिवलींग
शास्त्रानुसार, भगवान शिवाचे निवासस्थान कैलास पर्वत आहे, जे उत्तर दिशेला असल्याचे मानले जाते. घरामध्ये महादेवाची पिंड किंवा फोटो स्थापित करताना त्याची दिशा उत्तरेकडेच असावी हे लक्षात ठेवा.
तांडव नृत्य करतांनाचा फोटो लावू नये
शास्त्रानुसार भगवान शिव यांना भोले भंडारी या नावाने ओळखले जातात. आजच्या काळात बाजारात शंकराच्या अनेक मूर्ती आणि चित्रे उपलब्ध आहेत. अशा स्थितीत कधीही घरामध्ये भगवान शंकराचे क्रोध मुद्रोमधला कोणताही फोटो ठेवू नका. असे करणे हे विनाशाचे प्रतीक मानले जाते.
पूजेत या गोष्टी वापरू नये
शिवपूजेत लक्षात ठेवा की तुटलेला तांदूळ, सिंदूर, हळद, तुळस, शंख पाणी, केतकी, चंपा, केवड्याची फुले शिवलिंग आणि भोलेनाथावर अर्पण करू नयेत. असे केल्याने भगवान शिव क्रोधित होतात.
शिव कुटुंबाचा फोटो लावा
जर तुम्ही विवाहित असाल तर घरात शिव कुटुंबाचा फोटो लावा. भगवान शिवाच्या कुटुंबाच्या चित्रात गणेश आणि माता पार्वती दिसत आहेत पण कार्तिकेय दिसत नाही. एखाद्याने नेहमी अशी मूर्ती निवडावी ज्यामध्ये कार्तिकेय उपस्थित असेल कारण ते देखील भगवान शिवाचे पुत्र आहेत. तेच चित्र लावा, ज्यात भगवान शिव, माता पार्वती, भगवान गणेश आणि कार्तिकेय आहेत.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)