black anklet benefits: पायात काळा धागा बांधण्याचे काय आहेत फायदे? ज्योतीषशास्त्रात दिली आहे माहिती
तुम्हालादेखील पायाला काळा धागा बांधायचा असेल तर त्याची पद्धत काय आहे आणि तो बांधल्यावर जीवनातील अडचणी कशा दूर होतील याबद्दल आपण जाणून घेऊया.
मुंबई, तुम्ही अनेकदा अनेकांना पायात काळा धागा बांधलेला पाहिला असेल. अनेकजण फॅशन म्हणून पायाला काळा दोरा बांधतात, तर अनेकजण काही वेगळ्या कारणामुळे हा उपाय करतात. ज्योतिषशास्त्राबद्दल सांगायचे तर असे म्हटले आहे की पायाला काळा धागा बांधल्याने (black anklet benefits) कुंडलीत राहू-केतूची स्थिती मजबूत होऊ शकते. तुम्हालादेखील पायाला काळा धागा बांधायचा असेल तर त्याची पद्धत काय आहे आणि तो बांधल्यावर जीवनातील अडचणी कशा दूर होतील याबद्दल आपण जाणून घेऊया.
पायात काळा धागा धारण केल्याने काय फायदा होतो
राहू-केतूला बळ देण्यासाठी
ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत राहू-केतूची स्थिती कमकुवत आहे, त्यांनी एका पायात काळा धागा बांधावा. असे मानले जाते की असे केल्याने राहू-केतू प्रसन्न होतात आणि जीवनातील अनेक समस्या आपोआप दूर होतात.
शनीचा प्रभाव कमी होतो
शनिदेव हा उग्र ग्रह मानला जातो. ज्यांच्यावर शनिची वक्रदृष्टी आहे किंवा त्याच्या राशीला शनीची साडेसती सुरू आहे त्यांनी पायात काळा धागा बांधल्याने शनिदेव प्रसन्न राहतात, त्यामुळे घरगुती कलह आणि आर्थिक संकटातून मुक्ती मिळते.
पुरुषांनी कोणत्या पायात धागा बांधावा?
ज्योतिषांच्या मते, जर पुरुषांना पायात काळा धागा बांधायचा असेल तर त्यांनी मंगळवारी उजव्या पायात घालावा. असे केल्याने कुंडलीत शनि ग्रह बलवान राहतो. यासोबतच राहू-केतूही त्रास देत नाहीत.
महिलांनी या पायाला बांधावा काळा धागा
स्त्रियांना पायात काळा धागा बांधायचा असेल तर डाव्या पायात घालणे योग्य आहे. मुलींनी शनिवारी हा धागा पायात घालावा. असे केल्याने मानसिक शांती मिळते आणि आरोग्य चांगले राहते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)