Budh Asta 2023 : बुध ग्रह सूर्याजवळ गेल्याने होणार अस्त, या राशींना 23 एप्रिलनंतर मिळणार पैसाच पैसा

Astrology 2023 : चंद्रानंतर सर्वात वेगाने गोचर करणारा ग्रह म्हणजे बुध. सूर्याच्या अगदी जवळ असल्याने या ग्रहाचं वक्री, तसेच अस्ताला जाण्याचं प्रमाण अधिक आहे. 23 एप्रिल 2023 रोजी बुध ग्रह अस्ताला जाणार आहे.

Budh Asta 2023 : बुध ग्रह सूर्याजवळ गेल्याने होणार अस्त, या राशींना 23 एप्रिलनंतर मिळणार पैसाच पैसा
बुध राशी परिवर्तन
Follow us
| Updated on: Apr 21, 2023 | 4:22 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रात इतक्या वेगाने घडामोडी घडत असतात की त्याचा रोजच्या मानवी जीवन आणि पृथ्वीवर परिणाम होत असतो. 22 एप्रिल रोजी गुरु ग्रह मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. दुसरीकडे 23 तारखेला बुध मेष राशीत अस्ताला जाणार आहे. सध्या बुध ग्रह मेष राशीत वक्री अवस्थेत आहे. दुसरीकडे 23 एप्रिल 2023 रोजी रात्री 11 वाजून 53 मिनिटांना अस्ताला जाणार आहे. सूर्यही याच राशीत असल्याने बुधाचं तेज कमी होणार आहे. त्यामुळे या स्थितीचा काही राशींना जबरदस्त फायदा होणार आहे.

ग्रह मंडळात बुध ग्रहाला बुद्धि, तर्क, वाणी, शिक्षण, लेखन आणि ज्योतिष विज्ञानाचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह चांगल्या स्थितीत आहे त्यांना जीवनात आनंद प्राप्त होतो. त्यामुळे अस्ताला जाणाऱ्या बुध ग्रहाचा कोणत्या राशींना लाभ मिळेल जाणून घेऊयात

या राशींना मिळणार लाभ

मेष : या राशीच्या सहाव्या आणि तिसऱ्या स्थानाचा स्वामी बुध ग्रह आहे. त्यात सध्या गोचर करत बुध या राशीत आहे. त्यामुळे पहिल्या स्थानात बुध अस्ताला जाणार आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना जबरदस्त फायदा होणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करत सरकारी नोकरीसाठी प्रयत्नशील असणाऱ्यांना लाभ मिळेल. आत्मविश्वास वाढेल. त्याचबरोबर कौटुंबिक वातावरण चांगलं राहील.

कुंभ : या राशीच्या तिसऱ्या स्थानात बुध ग्रह अस्ताला जाणार आहे. बुध ग्रह या राशीच्या पाचव्या आणि आठव्या स्थानाचा स्वामी आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांनाही फायदा होईल. नोकरी आणि व्यवसायात चांगले परिणाम दिसून येतील. शत्रूंना परास्त करण्यात तुम्हाला यश मिळेल. दुसरीकडे, अडकलेली कामंही पूर्ण होतील. पण विनाकारण पैसा खर्च करू नका. विदेश यात्रा करण्याची संधी मिळू शकते.

मीन : या राशीच्या दुसऱ्या स्थानात बुध ग्रह अस्ताला जात आहे. या स्थानात खासगी आयुष्य आणि कुटुंब याच्याशी जोडून पाहिलं जातं. त्यामुळे या राशीच्या जातकांना संमिश्र प्रतिसाद मिळेल. आर्थिक स्थितीत चढ उतार दिसून येतील. दुसरीकडे नोकरीच्या ठिकाणी कामाचं कौतुक होईल आणि पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. पण रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.