Budh Gochar : बुध ग्रह फेब्रुवारी दोन वेळा करणार राशी परिवर्तन, या राशींच्या नशिबाचं दार उघडणार

चंद्रानंतर वेगाने राशीबदल करणारा ग्रह म्हणजे बुध..सूर्याच्या अगदी जवळ असल्याने अस्त-उदय आणि वक्री अवस्थेत जाण्याचं प्रमाण अधिक आहे. असं असताना बुध ग्रह फेब्रुवारी महिन्यात दोन वेळा राशीबदल करणार आहे. यामुळे राशीचक्रावर शुभ अशुभ परिणाम होणार आहे.

Budh Gochar : बुध ग्रह फेब्रुवारी दोन वेळा करणार राशी परिवर्तन, या राशींच्या नशिबाचं दार उघडणार
Budh Gochar : बुध ग्रहाचे फेब्रुवारी महिन्यात मार्गक्रमणाचे दोन टप्पे, बदल होताच राशीचक्रावर होणार असा परिणाम
Follow us
| Updated on: Jan 30, 2024 | 2:34 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह फेब्रुवारी महिन्यात दोन वेळा राशीबदल करणार आहे. त्यामुळे बुध ग्रहाच्या स्थितीकडे लक्ष लागून आहे. पहिल्यांदा बुध ग्रह धनु राशीतून मकर राशीत 1 फेब्रुवारीला येणार आहे. या राशीत सूर्य असल्याने बुधादित्य योग तयार होणार आहे. मात्र 13 फेब्रुवारीला सूर्य ग्रह गोचर करत कुंभ राशीत जाणार आहे. त्यानंतर 20 फेब्रुवारी बुध ग्रह कुंभ राशीत विराजमान होईल. त्यानंतर पुन्हा शुभ असा बुधादित्य योग तयार होणार आहे. मकर आणि कुंभ या दोन्हीही शनिच्या राशी आहेत. तर कुंभ राशीत खुद्द शनिदेव विराजमान आहेत. बुध आणि शनिमध्ये मैत्रिपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे काही राशींना या स्थितीचा लाभ होणार आहे. खऱ्या अर्थाने यावेळी कठीण कामं सोपी होतील असं म्हणायला हरकत नाही.

या तीन राशींना मिळणार लाभ

मकर : बुध ग्रह पहिले 20 दिवस लग्न स्थानात असतील. त्यानंतर धन आणि वाणी स्थानात विराजमान होतील. आत्मविश्वासात वाढ होईल. समाजात मानसन्मान मिळेल. व्यवसायिकांसाठी हा काळ उत्तम राहील. उद्योगधंद्यातील अडचणी दूर होतील आणि उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. कौटुंबिक पातळीवरही आनंदी वातावरण राहील. जोडीदाराची उत्तम साथ या काळात लाभेल.

कन्या : या राशीच्या पंचम आणि षष्टम स्थानात बुध ग्रह असणार आहे. मुसंतानप्राप्तीसाठी प्रतिक्षेत असलेल्यांना गूड न्यूज मिळू शकते. लांच्या अभ्यासात प्रगती दिसून येईल. विदेशात शिक्षणाची इच्छा पूर्ण होईल. मुलांची प्रगती पाहून आनंद होईल. प्रेमप्रकरणात या कालावधीत यश मिळू शकते. न्यायालयीन प्रकरणातही या काळात यश मिळण्याची दाट शक्यता आहे.

मेष : या राशींसाठी बुधाची स्थिती अनुकूल परिस्थिती निर्माण करेल. हात घालाल त्या कामात यश मिळताना दिसेल. त्यामुळे कामं झटपट पूर्ण होतील. आर्थिक स्थितीही पहिल्यापेक्षा अधिक सुधारलेली राहील. नोकरी तसेच करिअरमध्ये एक वेगळीच उंची गाठाल. व्यवसायिक असाल तर तुम्हाला आवश्यक तो लाभ मिळू शकतो. उत्पन्नात वाढ होईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.