Budh Grah 2023 : बुध ग्रह मेष राशीत 15 मे पासून होणार मार्गी, या राशींना मिळणार पाठबळ

ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचं स्वत:चं असं महत्व असतं. त्यामुळे त्या ग्रहाच्या गोचर, मार्गी आणि वक्री स्थितीकडे ज्योतिषांचं लक्ष लागून असतं. चला जाणून घेऊयात राशीचक्रावरील परिणाम

Budh Grah 2023 : बुध ग्रह मेष राशीत 15 मे पासून होणार मार्गी, या राशींना मिळणार पाठबळ
Budh Grah : बुध ग्रह 15 मे पासून होणार मार्गस्थ, या राशींची आर्थिक कोंडी फुटणार
Follow us
| Updated on: May 11, 2023 | 3:35 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्रानंतर सर्वात वेगाने भ्रमण करणारा ग्रह म्हणजे बुध. सध्या मेष राशीत असलेल्या बुध ग्रहाचा 10 मे रोजी सकाळी 5 वाजून 39 मिनिटांनी उदय झाला आहे. वक्री अवस्थेत उदय झालेल्या बुध ग्रह 15 मे पासून मार्गी होणार आहे. तसेच 7 जूनला संध्याकाळी 7 वाजून 44 मिनिटांनी वृषभ राशीत प्रवेश करते. सध्याच्या स्थितीचा कोणत्या राशींवर सकारात्मक परिणाम होईल जाणून घेऊयात.

या राशींवर होणार सकारात्मक परिणाम

मीन : या राशीच्या द्वितीय म्हणजेच धनस्थानात बुध ग्रहाचा उदय झाला आहे. त्याचबरोबर मार्गी होणार आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना आर्थिक लाभ मिळेल. अडकलेले पैसे मिळतील. आपल्या वाणीच्या जोरावर काही कठीण कामं सहज पूर्ण कराल. वडिलोपार्जित संपत्तीतून फायदा होईल. घर किंवा वाहन खरेदीसाठी योग्य काळ आहे. आरोग्यविषयक तक्रारी डोकं वर काढेल.

मिथुन : या राशीच्या एकादश भाव म्हणजेच लाभ भावात बुधाचा प्रभाव असणार आहे. यामुळे उत्पन्नात चांगली वाढ होईल. गुंतवणुकीतून चांगला परतावा या काळात मिळू शकतो. कुटुंबातील मोठी व्यक्ती किंवा भावाचा सहकार्य मिळेल. बॉससोबत संबंध बिघडणार नाही याची काळजी घ्या. नवदांपत्यांसाठी संतान प्राप्तीचा योग आहे.

कर्क : या राशीच्या दशम भाव म्हणजेच कर्म भावात बुध ग्रहाचा उदय होणार आहे. या काळात तुमचा समाजात मान सन्मान वाढेल. नवी नोकरी स्वीकारण्यासाठी गोचर अनुकूल आहे. आई वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. जमीनीशी निगडीत प्रकरणं निकाली लागतील. वाहन खरेदीचा योग जुळून येईल.

सिंह : या राशीच्या नवम भाव म्हणजेच भाग्य स्थानात बुध ग्रह गोचर करणार आहे. धर्म आणि आध्यात्मिक प्रगती या काळात होईल. हाती घेतलेल्या कामाचं कौतुक होईल. या तुमच्या हातून दानासारखं पुण्याचं काम होईल. कुटुंबात वाद होतील असं वागू नका. प्रवासाचा योग जुळून येईल.

तूळ : या राशीच्या सप्तम भावात म्हणजेच वैवाहिक भावात बुध गोचर आहे. वैवाहिक जीवनात चांगली बातमी कानी पडेल. जोडीदाराची तुम्हाला चांगली साथ मिळेल. पार्टनरशिपच्या धंद्यात चांगलं यश मिळेल. नवे करार या काळात निश्चित होऊ शकतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.