एक वर्षानंतर बुध करणार मकर राशीत प्रवेश, तीन राशींवर असा होणार सकारात्मक परिणाम
नववर्ष सुरु झालं असून ग्रहांच्या उलथापालथी सुरु आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम राशीचक्रावर होतंच असतो. काही ग्रह सकारात्मक, तर काही ग्रह नकारात्मक परिणाम देतात. आता बुध ग्रहाची पाळी असून गोचर करताच तीन राशींचं नशिब फळफळणार आहे. राशीचक्रातील कोणत्या राशींवर कृपा होईल ते जाणून घेऊयात..
मुंबई : ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचं असं महत्त्व आहे. प्रत्येक ग्रह काही ना काही फळ देत असतो. ग्रह कितीही कठोर असला तरी ज्या स्थानात विराजमान आहे तिथे काही ना काही देऊन जातो. शनि, राहु-केतुही चांगली फळं देऊन जातात. राजाचा रंक आणि रंकाचा राजा होतो. त्यामुळे गोचर कुंडलीत ग्रहांची स्थिती खूप काही सांगून जाते. आता वर्षभर वेगवेगळ्या राशीत भ्रमण केल्यानंतर बुध ग्रह मकर राशीत येत आहे. मकर ही शनिच्या स्वामित्व असलेली रास आहे. तसेच या राशीला साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरु आहे. पण बुध ग्रहाच्या आगमनामुळे राशीचक्रावर सकारात्मक बदल दिसून येईल. बुध ग्रहाने 7 जानेवारीला धनु राशीत प्रवेश केला आहे. आता 1 फेब्रुवारील या राशीतून मकर राशीत प्रवेश करेल. मकर राशीच्या लग्न स्थानात आल्यानंतर दशम, नवम आणि पंचम स्थानातील गोचर असलेल्या राशींना लाभ होईल. कारण बुध आणि शनि यांच्या मित्रत्वाची स्थिती आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना लाभ होईल. चला जाणून घेऊयात कोणत्या राशींना लाभ मिळणार ते..
या तीन राशींना मिळणार लाभ
मेष : या राशीच्या दशम स्थानात म्हणजेच व्यवसाय आणि करिअर स्थानात बुधाचं आगमन होत आहे. बुध हा बुध्दीचा देवता आहे. त्यामुळे आपल्या बौद्धिक क्षमतेच्या जोरावर करिअरमध्ये नवीन उंची गाठता येईल. मनासारखी नोकरीही या कालावधीत मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या जातकांना भरभराट करणाऱ्या ऑर्डर मिळू शकतात.
वृषभ : या राशीच्या नवम स्थानात बुध ग्रह गोचर करणार आहे. या स्थानाला लाभस्थान म्हंटलं जातं. त्यामुळे नशिबाची जबरदस्त साथ मिळणार आहे. काही इच्छा पूर्ण होतील. शेअर बाजारात किंवा इतर ठिकाणी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळू शकतो. या कालावधीत घरी काही मंगळ कार्य घडतील.
कन्या : या राशीच्या पंचम स्थानात बुध ग्रहाचं गोचर होणार आहे. या राशीच्या लग्न आणि कर्म स्थानाचा स्वामी ग्रह बुध आहे. पंचम स्थान ज्ञान आणि संतान भाकित वर्तवतं. बुध ग्रह या स्थानात आल्याने मुलांच्या अभ्यासात प्रगती दिसून येईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या जातकांना अपेक्षित लाभ होईल. त्याचबरोबर कौटुंबिक स्तरावर आनंदी वातावरण राहील.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)