Budh Gochar 2023 : मेष राशीत बुध ग्रह तेजासह करणार प्रवेश, 30 मार्चला होणार उदीत

बुध ग्रह मेष प्रवेश करण्यापूर्वी मीन राशीत उदीत होणार आहे. त्यामुळे काही राशींना अशुभ फळांचा सामना करावा लागू शकतो. चला जाणून घेऊयात त्या चार राशी कोणत्या आहेत.

Budh Gochar 2023 : मेष राशीत बुध ग्रह तेजासह करणार प्रवेश, 30 मार्चला होणार उदीत
बुध ग्रह स्वयंप्रकाशाने मेष राशीत करणार प्रवेश, गोचर कालावधी 4 चार राशींनी जरा जपूनच
Follow us
| Updated on: Mar 27, 2023 | 12:43 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रात चंद्रानंतर सर्वात वेगाने गोचर करणारा ग्रह म्हणजे बुध. ग्रहमंडळात बुधाला राजकुमाराचा दर्जा प्राप्त आहे आणि सूर्याच्या जवळ असलेला ग्रह आहे. त्यामुळे बुध ग्रहाचं अस्ताला आणि उदयाला येणाचं प्रमाण इतर ग्रहांच्या तुलनेत जास्त आहे. सध्या बुध ग्रह मीन राशीत आहे. या राशीत 30 मार्च 2023 रोजी संध्याकाळी 6 वाजून 39 मिनिटांनी बुध ग्रह उदीत होईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 31 मार्च 2023 रोजी मेष राशीत प्रवेश करेल. या स्थितीचा फटका चार राशींना बसणार आहे. त्या काळात चढ-उतारांचा सामना करावा लागणार आहे. चला जाणून कोणत्या राशींनी या काळात जपून राहीलं पाहीजे.

वृषभ – बुध वृषभ राशीच्या पंचम स्थानाचे स्वामी आहेत. त्यात बुध ग्रह कुंडलीतील 12 व्या स्थानात उदीत होणार आहे. त्यामुळे बुधाची ही स्थिती अनुकूल नसेल. त्यामुळे अचानक काही संकटांचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची तब्येत या काळात ढासळलेल. त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांचं मनंही या काळात अभ्यासात रमणार नाही. आर्थिक स्थितीही चांगली नसल्याने कौटुंबिक कलह निर्माण होतील. बुधवारी गायीला हिरवा चारा खायला घाला.

कर्क – या राशीच्या गोचर कुंडलीतील दहाव्या स्थानात बुध ग्रह उदीत होणार आहे. त्यामुळे या काळात अपेक्षित फळ मिळणं कठीण आहे. समाजात बदनामी होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये काही चढ-उतार अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे. बॉस आणि सहकाऱ्यांसोबत वाढ होऊ शकतात. नोकरीत मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.उपाय म्हणून बुधवारी 5 कन्यांना पेढे खाण्यास द्या.

कन्या – या राशीच्या आठव्या स्थानात बुध ग्रह उदीत होणार आहे. त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसण्याची चिन्ह आहेत. कौटुंबिक वातावरणही तणावाचं राहील. आरोग्यविषयक तक्रारींनी पुरते ग्रासून जाल. त्यामुळे पैशांची उणीव या काळात भासेल. इतकंच काय तर जवळचे नातेवाईकही ऐनवेळी मदतीसाठी पाठ फिरवतील. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ शकतं. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा. बुधवारी देवी दुर्गेला दुर्गा वाहा आणि सप्तशतीचा पाठ करा.

कुंभ – या राशीच्या तिसऱ्या स्थानात बुध ग्रह उदीत होणार आहे. त्यामुळे छोट्या भावा बहिणीकडून त्रास होऊ शकतो. या काळात अचानक अडणींचा डोंगर उभार राहील. मोठी डिल करताना सावध राहा. नोकरीच्या ठिकाणी प्रमोशनला फटका बसू शकतो. गुंतवणूक करताना काळजी घ्याल. बुधवारी हिरवे वस्त्र दान करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.