Astrology : 15 सप्टेंबरपासून तीन राशीच्या जातकांसाठी सुवर्णकाळ, कोणत्या राशी आहेत ते जाणून घ्या
ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचं एक महत्त्व सांगितलं गेलं आहे. त्या ग्रहाला अनुसरून काही बदल झाल्यास राशीचक्रावर परिणाम होतो. 15 सप्टेंबरला बुध ग्रह मार्गस्थ होणार आहे.
मुंबई : ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहांचं अस्तित्व सांगितलं गेलं आहे. नवग्रहांमध्ये बुध ग्रहाला राजकुमाराचा दर्जा देण्यात आला आहे. तसेच बुध्दीचा कारक ग्रह म्हणून गणला गेला आहे. बुध हा चंद्रानंतर सर्वात वेगाने राशी बदल करणारा ग्रह आहे. सूर्याजवळचा ग्रह असल्याने त्यात उदय आणि अस्ताला जाण्याचं प्रमाण देखील जास्त आहे. बुध ग्रह सिंह 24 ऑगस्टपासून अस्ताला गेला आहे. 15 सप्टेंबरपर्यंत अशाच स्थितीत असून त्यानंतर मार्गस्थ होणार आहे. त्यामुळे बुध ग्रहाची ही स्थिती राशीचक्रावर सकारात्मक बदल घडवून आणणारा आहे. यामुळे राशीचक्रातील तीन राशींना जबरदस्त फायदा होणार आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या राशींना फायदा होणार ते
तीन राशीच्या जातकांना होणार लाभ
कर्क : बुध ग्रह मार्गस्थ झाल्यानंतर या राशीच्या जातकांना लाभ होणार आहे. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर नक्कीच फायदा होईल. उद्योग धंद्यात प्रगती दिसून येईल. नोकरी करणाऱ्या जातकांना नवीन प्रोजेक्य मिळू शकतो. लाईफ पार्टनरसोबत चांगला टाईम स्पेंड कराल. जोडीदाराकडून तुमच्या कामाचं कौतुक होईल. त्याचबरोबर तुमचं नातं आणखी घट्ट होईल. परदेशात जाण्याचा योग जुळून येईल.
वृषभ : बुध ग्रह मार्गी होताच काही शुभ बातम्या कानावर पडतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सकारात्मक बदल दिसून येईल. व्यवसाय करणाऱ्यांना प्रगती दिसून येईल. उत्पन्नाचे नवे स्रोत या कालावधीत निर्माण होतील. आरोग्याच्या दृष्टीकोनातून तुम्हाला हा कालावधी चांगला जाईल. काही जुने आजार समूळ नष्ट होतील. तसेच जुनं दुखणं बरं होऊ शकतं. वाद होईल असं या काळात वागू नका.
तूळ : विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या जातकांना फायदा होईल. व्यवसायात काही नवीन योजना राबवाल. तसेच एखादा करार या कालावधीत निश्चित होऊ शकतो. मित्रांच्या भेटीगाठी या कालावधीत होतील. तसेच उत्पन्नाच्या नव्या स्रोताबाबत माहिती मिळेल. शेअर बाजारातील गुंतवणूक फलदायी ठरू शकते. जोडीदारासोबत प्रेमाने वागा. त्यांच्या भावनांचा आदर करा. उगाचच वाद होईल असं अजिबात वागू नका.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)