Budh Vakri : बुध ग्रह 28 डिसेंबरपर्यंत असणार वक्री अवस्थेत, या राशींना मिळणार जबरदस्त साथ

ज्योतिषशास्त्रातील बुध हा एक महत्त्वपूर्ण ग्रह आहे. या ग्रहाचं गोचर चंद्रानंतर सर्वाधिक वेगाने होत असतं. यामुळे राशीचक्रावर परिणाम दिसून येतो. बुध ग्रह पुढच्या 15 दिवस वक्री अवस्थेत असणार आहे. त्यामुळे राशीचक्रावर परिणाम दिसून येईल. चला जाणून घेऊयात राशीचक्रातील कोणत्या राशींना फायदा होईल ते...

Budh Vakri : बुध ग्रह 28 डिसेंबरपर्यंत असणार वक्री अवस्थेत, या राशींना मिळणार जबरदस्त साथ
Budh Vakri : बुध ग्रहाची वक्री स्थिती काही राशींच्या पथ्यावर, या राशीची अडकलेली कामंही होणार पूर्ण
Follow us
| Updated on: Dec 13, 2023 | 7:03 PM

मुंबई: राशीचक्रात बुध हा सर्वात लहान आणि सूर्याच्या जवळ असलेला ग्रह आहे. बुध हा चंद्रानंतर सर्वात वेगाने राशी बदल करणारा ग्रह आहे. त्यात सूर्याच्या अगदी जवळ असल्याने उदय आणि अस्ताला जाण्याचं प्रमाण अधिक आहे. त्यात वक्रीस्थितीही महत्त्वाची ठरते. बुध ग्रहाला ग्रहमंडळात राजकुमाराचा दर्जा देण्यात आला आहे. आता बुध ग्रह 15 दिवस वक्री अवस्थेत असणार आहे. 28 डिसेंबर 2023 पर्यंत बुध ग्रह वक्री अवस्थेत असेल. धनु राशीत वक्री अवस्थेत राहून राशीचक्रावर प्रभाव टाकेल. त्यानंतर वक्री अवस्थेतच वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे.बुध ग्रहाची वक्री स्थिती काही राशींना त्रासदायक, तर काही राशींना फलदायी ठरेल. 15 दिवस बुधाची उत्तम साथ तीन राशीच्या जातकांना मिळणार आहे. करिअर आणि व्यवसायात बुधाची उत्तम साथ लाभेल.

या तीन राशींना मिळेल लाभ

मकर : या राशीच्या जातकांच्या उत्पन्नात वाढ होईल. आपण ठरवलं त्याप्रमाणे मिळकत मिळेल. तसेच उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. कौटुंबिक आणि व्यवसायिक पातळीवर सकारात्मक परिणाम दिसून येतील. झटपट यश मिळेल. पण याने हुरळून जाऊ नका. पाय जमिनीवर ठेवा आणि भविष्याच्या दृष्टीकोनातून गुंतवणूक करा. पत्नीकडून एखादी गोड बातमी कानावर पडू शकते. तब्येतीची काळजी घ्या.

सिंह : या राशीच्या जातकांनाही बुध ग्रहाची वक्री स्थिती लाभदायी ठरेल. भौतिक सुखांची अनुभूती घेता येईल. गाडी किंवा घर खरेदी करू शकता. करिअरमध्येही नवीन उंची गाठाल. समाजात मानसन्मान वाढेल. देवदर्शनाचा योग जुळून येईल. जमिनीशी निगडीत व्यवहारातून चांगले पैसे मिळतील. आई वडिलांसोबत चांगले संबंध प्रस्थापित होतील.

मीन : बुध ग्रहाची वक्री स्थिती या राशीच्या जातकांसाठी फलदायी असेल. नशिबाची उत्तम साथ मिळेल. लॉटरी किंवा जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. कौटुंबिक कार्यक्रमात मानसन्मान मिळेल. नातेवाईकांकडून कौतुक होईल. तसेच नोकरीच्या ठिकाणी बॉसकडून तुमच्या कामाची दखल होईल. पदोन्नती किंवा पगारवाढीसाठी तुमच्या नावाची शिफारस होऊ शकते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.