Budhaditya Yoga: 16 नोव्हेंबरपासून बदलणार या राशीच्या लोकांचे भाग्य, बुधादित्य योगाने होणार धनलाभ
सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे बुधादित्य योग निर्माण होत आहे. याचा काही राशींना मोठा लाभ मिळणार आहे.
मुंबई, एकाच राशीतील दोन ग्रहांच्या मिलनास युति म्हणतात. याचा सर्व राशींवर परिणाम होतो. 16 नोव्हेंबर 2022 रोजी वृश्चिक राशीमध्ये सूर्य आणि बुधाचा संयोग बुधादित्य योग (Budhaditya Yoga) तयार करेल. ज्योतिषशास्त्रानुसार बुधादित्य योगाचा शुभ प्रभाव काही राशींवर दिसून येणार आहे. बुधादित्य योगाने धन आणि प्रतिष्ठा प्राप्त होते. चला जाणून घेऊया कोणत्या राशीच्या लोकांना या योगाचा फायदा होईल.
- मेष- बुधादित्य योगाने विशेष कार्य मार्गी लागेल. तणावातून तुम्हाला आराम मिळेल. दिलेले पैसे परत मिळू शकतात. तुम्हाला व्यवसायात नवीन ऑफर मिळतील. मालमत्तेशी संबंधित मोठे लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी शोधणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. घरातील वातावरण प्रसन्न राहील. तुमच्या व्यक्तिमत्त्वासमोर विरोधक पराभूत होतील. तुम्ही तुमचे काम व्यवस्थित पूर्ण करू शकाल. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात, त्यात यश मिळण्याची शक्यता आहे.
- मिथुन- मंगल कार्याबाबत नियोजन होईल. सामाजिक कार्यात हातभार लावाल. तब्येत ठीक राहील. प्रतिभा आणि कर्तृत्वाने विशिष्ट स्थान प्राप्त करू शकाल. कार्यक्षमता वाढेल. नोकरीत बढतीची संधी मिळू शकते. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील. भागीदारीच्या कामात लाभ मिळेल. पती-पत्नीच्या नात्यात प्रेम वाढेल. जवळच्या व्यक्तीचा सल्ला तुम्हाला अडचणीतून बाहेर काढण्यास मदत करेल.
- कन्या- बुधादित्य योग तुम्हाला शक्ती देईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. तुमच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल होईल. एखाद्या विशिष्ट कार्यासाठी प्रयत्नशील राहाल. पदोन्नतीची शक्यता वाढेल. मोठ्या भावाची साथ मिळेल. तुमच्या अवतीभवती सकारात्मक बदलांचा अनुभव येईल. नवीन धोरण बनवण्याची हीच योग्य वेळ आहे. नोकरी आणि मुलाखतीत यशाचे योग वाढत आहेत.
- सिंह- सिंह राशीच्या लोकांना सूर्य आणि बुध यांच्या संयोगाने लाभ होईल. या काळात जमीन किंवा वाहन खरेदी होण्याची शक्यता आहे. भौतिक सुखाची प्राप्ती होईल. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात योग्य निर्णय घेऊन यश मिळेल. नोकरदार लोकांना इच्छित नोकरी मिळेल. नवीन माहिती मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहील.
- वृश्चिक- बुधादित्य योग तुम्हाला शुभ परिणाम देईल. व्यवसाय आणि नोकरीच्या क्षेत्रात यश मिळेल. व्यवसायात विस्तारासाठी काळ अनुकूल आहे. सुख-सुविधांशी संबंधित वस्तू खरेदी करता येतील. आर्थिक बाजू मजबूत राहील. विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतील. नशीब तुम्हाला प्रत्येक परिस्थितीशी लढण्याचे बळ देईल. प्रेमसंबंध मजबूत होतील.
- धनु- सूर्य आणि बुध यांच्या संयोगाने धनु राशीला विशेष लाभ मिळेल. नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात. नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर वेळ अनुकूल आहे. भावंडांशी संबंध दृढ होतील. सामाजिक कार्यात तुमचे विशेष योगदान असेल. प्रेम प्रस्ताव प्राप्त होऊ शकतो. आनंद आणि उत्साह अनुभवाल.
हे सुद्धा वाचा
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)