Budhwar Upay : जीवनात प्रगती थांबली आहे? बुधवारच्या दिवशी अवश्य करा हे उपाय

आठवड्यातील बुधवार हा गणपतीला समर्पित असतो. आज गणपतीची आराधना केल्याने शक्ती, बुद्धी आणि संपत्तीचा आशीर्वाद मिळतो. नोकरी किंवा व्यावसायात प्रगती थांबली असल्यास काही उपाय असृवश्य करा

Budhwar Upay : जीवनात प्रगती थांबली आहे? बुधवारच्या दिवशी अवश्य करा हे उपाय
बुधवार उपायImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 12, 2023 | 3:55 PM

मुंबई : आज कृष्ण पक्षातील दशमी तिथी आणि बुधवार (Budhwar Upay) आहे. दशमी तिथी आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत राहील. आज सकाळी 9.39 पासून धृति योग असेल. यासोबतच भरणी नक्षत्र आज संध्याकाळी 7.43 पर्यंत राहील. आठवड्यातील बुधवार हा गणपतीला समर्पित असतो. आज गणपतीची आराधना केल्याने शक्ती, बुद्धी आणि संपत्तीचा आशीर्वाद मिळतो. गणपतीला विघ्नहर्ता देखील म्हणतात. बुधवारी गणरायाची आराधना केल्यास प्रगतीच्या मार्गातील बाधा दूर होतात. जाणून घेऊया की विविध शुभ फल प्राप्त करण्यासाठी आज कोणते उपाय केले पाहिजेत.

असे आहेत प्रभावी उपाय

  1.  जीवनात सुख-समृद्धी मिळवायची असेल तर या दिवशी आवळ्याच्या झाडाच्या मुळास जल अर्पण करावे. यासोबत आवळ्याच्या झाडाला हात जोडून नमस्कार करावा.
  2.  जर तुम्हाला तुमच्या घरात धन आणि समृद्धी वाढवायची असेल तर या दिवशी लक्ष्मीची पूजा करावी. या दिवशी संध्याकाळी देवी लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावावा आणि हात जोडून देवीला धन-धान्य वाढीसाठी प्रार्थना करावी.
  3.  जर तुमच्या वैवाहिक नात्यात कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर ती समस्या दूर करण्यासाठी भरणी नक्षत्रात शुक्र मंत्राचा 21 वेळा जप करावा. शुक्राचा मंत्र पुढीलप्रमाणे आहे- ‘ओम द्रां द्रीं द्रौण स: शुक्राय नमः’.
  4.  जर तुम्हाला तुमचे तेज टिकवून ठेवायचे असेल, तर या दिवशी तुम्ही चांगला सुगंध असलेले अत्तर आणावे आणि ते अत्तर मंदिरात किंवा धार्मिक स्थळी अर्पण करावे. यासोबतच आपली कुशाग्रता टिकवून ठेवण्यासाठी देवाला प्रार्थना करावी.
  5. जर तुम्हाला तुमच्या प्रियकरांसोबत नाते घट्ट करायचे असेल तर या दिवशी तुमच्या घराच्या मध्यभागी त्रिकोणाचा आकार बनवावा. पांढऱ्या खडूच्या किंवा मैद्याच्या मदतीने तुम्ही तो आकार बनवू शकता. आता त्या त्रिकोणाच्या आकारात आवळा ठेवा आणि त्याची विधीवत पूजा करा.
  6. जर आवळा उपलब्ध नसेल तर तुम्ही बटाटा देखील ठेवू शकता. पूजेनंतर सर्व गोष्टी एक दिवस अशाच ठेवाव्यात. दुसऱ्या दिवशी त्या वाहत्या पाण्यात सोडून द्याव्या.
  7. जर तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल, परंतु काही कारणास्तव ते शक्य होत नसल्यास, तुमच्या व्यवसायात वाढ होण्यासाठी बुधवारी पांढऱ्या रंगाचे कपडे घाला
  8. जर तुमच्या जीवनसाथीची प्रगती थांबली असेल आणि तो किंवी ती पुढे जाऊ शकत नसेल, तर या दिवशी तुम्ही त्यांच्या हातून ज्वारी दान करा. जर त्यांनी ते स्वतः केले नाही, तर तुम्ही त्यांच्याऐवजी दान करू शकता.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा.
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?.
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल.
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा.
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल.
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल.