Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चैत्र नवरात्रीत मंगळ आणि चंद्राच्या युतीमुळे महालक्ष्मी योग, चार राशींना मिळेल अपेक्षित फळ

चैत्र नवरात्रीत चंद्र आणि मंगळाच्या युतीमुळे महालक्ष्मी योग जुळून आला आहे. हा योग रामनवमी म्हणजेच 30 मार्चपर्यंत असणार आहे. या स्थितीचा फायदा चार राशींना होणार आहे.

चैत्र नवरात्रीत मंगळ आणि चंद्राच्या युतीमुळे महालक्ष्मी योग, चार राशींना मिळेल अपेक्षित फळ
Chaitra Navratra : मंगळ आणि चंद्राच्या युतीमुळे महालक्ष्मी योग, तीन राशींना मिळेल अपेक्षित फळ
Follow us
| Updated on: Mar 03, 2023 | 5:37 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशीबदल करतो. त्यामुळे एका राशीत एकापेक्षा जास्त ग्रहांची भेट होते. या भेटीमुळे काही शुभ अशुभ योग तयार होतात. ग्रहमंडळात चंद्र सर्वात वेगाने फिरणारा ग्रह आहे. एका राशीत सव्वा दोन दिवस राहिल्यानंतर चंद्र मार्गस्थ होतो. चंद्रांच्या मार्गक्रमणामुळे 28 मार्चला मिथुन राशीत मंगळासोबत युती होणार आहे. मिथुन राशीत मंगळ ग्रह 13 मार्चला गोचर करून ठाण मांडून बसणार आहे. ही युती 28 मार्च चैत्र सप्तमीपासून 30 मार्च 2023 रामनवमीपर्यंत असणार आहे. त्यामुळे जातकांना विशेष फायदा होणार आहे. मंगळ हा ग्रह साहस, पराक्रम, भूमि आणि उर्जेचा कारक ग्रह आहे. तर चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे.

चंद्र ग्रह 28 मार्च 2023 रोजी (मंगळवार) वृषभ राशीतून मिथुन राशीत सकाळी 04:25 मिनिटांनी प्रवेश करेल. चंद्र 30 मार्च 2023 (गुरुवार) दुपारी 16:15 मिनिटांपर्यंत मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल.

चार राशींना या काळात विशेष फायदा होईल

मिथुन- या राशीच्या पहिल्या स्थानात हा योग तयार होत आहे.या जातकांना महालक्ष्मी योग सकारात्मक बदल घडवून आणेल. या काळात अचानक धनलाभ होऊ शकतो. समाजाता मानसन्मान वाढेल. मीडिया तसेच फिल्म इंडस्ट्रीत काम करणाऱ्या लोकांना विशेष फायदा होईल. कौटुंबिक सुख या काळात अनुभवता येईल. कामाच्या ठिकाणी कामाचं कौतुक होईल.

वृषभ- या राशीच्या दुसऱ्या स्थानात हा योग तयार होत आहे. या काळात अडकलेले पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे. अर्थकारणाचे नवे स्रोत निर्माण होतील. मार्केटिंग आणि ट्रॅव्हलिंग क्षेत्राशी निगडीत लोकांना या काळात विशेष फायदा होईल. भौतिक सुख या काळात मिळण्याची दाट शक्यता आहे. वाहन खरेदीचा योग आहे.

कन्या- या राशीच्या दहाव्या स्थानात महालक्ष्मी योग तयार होत आहे. त्यामुळे या काळात चांगले दिवस अनुभवता येतील. नोकरी करणाऱ्या जातकांना या काळात पदोन्नती मिळू शकते. तसेच आर्थिक गणितही झपाट्याने बदलेल. व्यवसायिकांचे नवे करार निश्चित होतील. जुन्या गुंतवणुकीतून लाभ होण्याची दाट शक्यता आहे.

सिंह – महालक्ष्मी राजयोग या राशीच्या अकराव्या स्थानात तयार होत आहे. त्यामुळे हा योग या जातकांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. या काळात सुख समाधाना अनुभवता येईल. त्याचबरोबर मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. त्याचबरोबर समाजात मानसन्मान वाढेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?
आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?.
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला.
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार.
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं.
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट.
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक.
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?.
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?.
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत.