चैत्र नवरात्रीला सुरुवात होताच 3 राशींच्या मागे लागणार पनोती; 9 दिवस आयुष्यात होणार उलथापालथ
यावेळी चैत्र नवरात्र खरमासमध्ये सुरू होणार आहे. हिंदू धर्मात खरमासचा काळ चांगला मानला जात नाही. चैत्र नवरात्री खरमासमध्ये सुरू होत असल्याने तीन राशींना सावधगिरी बाळगावी लागणार आहे.

चैत्र महिन्यातील नवरात्र शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला साजरी केली जात असते. येत्या रविवारी म्हणजेच 30 मार्च रोजी चैत्र नवरात्र सुरू होणार आहे. तर ७ एप्रिल रोजी दशमी पूजेला त्याची सांगता होईल. दरवर्षी हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्र नवरात्रीपासून होते. म्हणून नवरात्रीचा काळ खूप शुभ मानला जातो.
यावेळी चैत्र नवरात्र खरमासपासून सुरू होणार आहे आणि खरमास १४ मार्चपासून सुरू झाला असून तो १४ एप्रिलपर्यंत चालेल. सूर्य मीन राशीत प्रवेश करतो तेव्हा खरमास सुरू होतो. तर सूर्य त्याच्या उच्च राशी मेष राशीत प्रवेश करतो तेव्हा संपतो. हिंदू धर्मात हा खरमासचा काळ वाईट मानला जातो. त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार यंदा चैत्र नवरात्री खरमासमध्ये सुरू होत असल्याने त्याचा वाईट परिणाम काही राशींवर होणार आहे. 12 राशींपैकी 3 राशी अशा असणार आहेत ज्यांना या काळात सावधगिरी बाळगावी लागणार आहे.
या 3 राशींवर होईल विपरीत परिणाम..
वृषभ रास वृषभ राशीच्या लोकांना चैत्र नवरात्रीमध्ये खरमास दरम्यान त्रास होऊ शकतो. या काळात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पैशाचे नुकसान होऊ शकते. या खरमासचा वैवाहिक जीवनावरही परिणाम होईल आणि जोडीदाराशी संघर्ष, मतभेद होऊ शकतात. ही वेळ संयमाने विचारपूर्वक निर्णय घेण्याची आहे. आर्थिक परिस्थितीवरही परिणाम होईल. खर्च वाढू शकतो. याशिवाय, वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्या बोलण्यावर देखील नियंत्रण ठेवणे आवश्यक असेल, शब्दांच्या चुकीच्या वापरामुळे कामाच्या ठिकाणी वाद निर्माण होऊ शकतात.
कन्या रास कन्या राशीच्या लोकांसाठी खरमासचा काळ हा आव्हानात्मक असू शकतो. या काळात, रागावर नियंत्रण ठेवणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे असेल. रागाच्या भरात घेतलेले निर्णय अडचणी वाढवू शकतात. तुम्हाला आयुष्यात अडचणी येऊ शकतात. विशेषतः मुलांच्या आरोग्याबाबत काही समस्या उद्भवू शकतात. ज्यामुळे मानसिक ताण येऊ शकतो. यासोबतच, हा काळ आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक असू शकतो आणि कर्ज घेण्याची परिस्थिती उद्भवू शकते. न्यायालयीन प्रकरणांमध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे कायदेशीर वादांमध्येही समस्या निर्माण होऊ शकतात.
कुंभ रास कुंभ राशीच्या लोकांसाठीही खरमासचा काळ काही समस्या आणि आव्हानांनी भरलेला असू शकतो. या काळात, तुमच्या नोकरी किंवा करिअरमध्ये अडथळे येऊ शकतात. ज्यामुळे तुमच्या कामात विलंब होऊ शकतो. सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे कामाचे वातावरण तणावपूर्ण बनू शकते. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. मानसिक त्रास आणि तणाव निर्माण होऊ शकतो. हा काळ संयम आणि समजूतदारपणे घालवावा लागेल, जेणेकरून आर्थिक आणि वैयक्तिक समस्यांना योग्यरित्या सामोरे जाता येईल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)