Chandal yog: आयुष्यात सतत करीत असाल समस्यांचा सामना तर कुंडलीत असू शकतो चांडाल योग

बृहस्पति आणि राहु एका राशीत किंवा घरामध्ये एकत्र असतात किंवा कुंडलीत एकमेकांशी कोणत्याही प्रकारे संबंधित असतात तेव्हा कुंडलीत चांडाल योग (Chandal yog) तयार होतो. या दोघांच्या संयोगाने गुरु चांडाल योग किंवा चांडाल दोष (chandal dosh) निर्माण होतो, जी कुंडलीत फार मोठी विसंगती मानली जाते. या योगामुळे जीवनात विविध प्रकारच्या सुखसोयींमध्ये आणि जीवनात पुढे जाण्यासाठी अडचणींचा सामना […]

Chandal yog: आयुष्यात सतत करीत असाल समस्यांचा सामना तर कुंडलीत असू शकतो चांडाल योग
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 9:46 AM

बृहस्पति आणि राहु एका राशीत किंवा घरामध्ये एकत्र असतात किंवा कुंडलीत एकमेकांशी कोणत्याही प्रकारे संबंधित असतात तेव्हा कुंडलीत चांडाल योग (Chandal yog) तयार होतो. या दोघांच्या संयोगाने गुरु चांडाल योग किंवा चांडाल दोष (chandal dosh) निर्माण होतो, जी कुंडलीत फार मोठी विसंगती मानली जाते. या योगामुळे जीवनात विविध प्रकारच्या सुखसोयींमध्ये आणि जीवनात पुढे जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. या योगाने प्रभावित व्यक्ती खूप भौतिकवादी असते, आणि ती आपल्या जीवनात नकारात्मकतेकडे वाटचाल करतो. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते. याशिवाय ज्याला  पैसे कमवण्याची तीव्र इच्छा आहे, तो योग्य आणि अयोग्य मार्गातील फरक ओळखू शकत नाही. अशा स्थितीत ती व्यक्ती चारित्र्य ऱ्हासाची बळी ठरते आणि काही विशिष्ट परिस्थितीत ती हिंसक आणि मूलतत्त्ववादीही बनू शकते.

उपाय-

चांडाल योग शांत करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे गुरु चांडाल दोष निवारण पूजा. खरं तर, ही अशी पूजा आहे, ज्यामुळे गुरु चांडाल योगाचा प्रभाव खूप कमी होतो, म्हणून तुम्ही योग्य ब्राह्मणाकडून गुरु चांडाल योग शांती पूजा करून घेऊ शकता. तुमच्या कुंडलीत बृहस्पतिचे स्थान शुभ असेल तर तुम्ही ब्राह्मणांना दान द्यावे आणि गुरू तुल्य  लोकांना मान द्यावा. अशा लोकांनी गुरुवारी केळीचे झाड लावून त्याची पूजा करावी. जर तुमच्या कुंडलीत चांडाल योग तयार होत असेल तर तुम्ही गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करून त्यांना पिवळे चंदन अर्पण करावे.

हे सुद्धा वाचा
  1. राहू ग्रह शांत करून राहूच्या बीज मंत्रांचा जप करावा.
  2. नाभी, मान, डोके, कान आणि जिभेवर दररोज केशर लावावे.
  3. गुरुवारी विद्यार्थ्यांनी शिक्षणाशी संबंधित साहित्य दान करावे.
  4. जर तुमच्या कुंडलीत हा चांडाल योग फारच अशुभ प्रभाव देत असेल तर तुम्ही जीवनातील कोणतेही काम घरातील ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला घेऊनच करा.
  5. गौ मातेची नियमित सेवा करा आणि तिला गहू आणि हिरवे गवत खायला द्या.
  6. वटवृक्षाच्या मुळास कच्चे दूध अर्पण करावे.
  7. भगवान श्री गणेश आणि माता सरस्वती यांची नियमित पूजा केल्याने चांडाल योगाच्या दुष्परिणामांपासूनही तुमचे रक्षण होते.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.