Chandra Grahan 2023 : वर्षाच्या पहिल्या चंद्रग्रहणाला मेष राशीत जुळून येतोय चतुर्ग्रही योग, या राशीच्या लोकांवर होणार परिणाम

वैज्ञानिकदृष्ट्या, जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण होते. धार्मिक दृष्टीने चंद्रग्रहण अत्यंत अशुभ मानले जाते. ग्रहणाच्या काळात अनेक प्रकारच्या शुभ कार्यांवर बंदी असते आणि ग्रहणाचा अनेक राशींवर परिणाम होतो.

Chandra Grahan 2023 : वर्षाच्या पहिल्या चंद्रग्रहणाला मेष राशीत जुळून येतोय चतुर्ग्रही योग, या राशीच्या लोकांवर होणार परिणाम
चंद्रग्रहणImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Apr 30, 2023 | 10:01 AM

मुंबई : 5 मे 2023 ला वर्षातील पहिले चंद्रग्रहण (Chandra Grahan 2023) होणार आहे. यंदा 12 वर्षांनंतर चंद्रग्रहणात सूर्य, बुध, गुरु आणि राहूचा चतुर्ग्रही योग मेष राशीत तयार होत आहे. हे छाया चंद्रग्रहण तूळ राशीत आणि स्वाती नक्षत्रात दिसेल. वैज्ञानिकदृष्ट्या, जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण होते. धार्मिक दृष्टीने चंद्रग्रहण अत्यंत अशुभ मानले जाते. वर्षातील पहिल्या चंद्रग्रहणाचा काही राशींवर शुभ प्रभाव पडत असला तरी काही राशींसाठी ते अशुभ सिद्ध होणार आहे. चला जाणून घेऊया मे महिन्यात होणाऱ्या चंद्रग्रहणापासून कोणत्या राशीच्या लोकांनी काळजी घ्यावी.

या राशीच्या लोकांना घ्यावी लागणार काळजी

मेष

वर्षातील पहिले चंद्रग्रहण तूळ राशीत होणार असून चंद्र केतूचा संयोगही येथे होत आहे. अशा स्थितीत चंद्राची पहिली दृष्टी मेष राशीवर पडेल. अशा स्थितीत मेष राशीच्या लोकांना चंद्रग्रहणाच्या दिवशी काळजी घ्यावी लागेल. आर्थिकदृष्ट्या कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा, घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. मेष राशीच्या लोकांना चंद्रग्रहणामुळे मानसिक समस्यांना सामोरे जावे लागेल. यापासून आराम मिळवण्यासाठी ग्रहणकाळात मंत्राचा जप करावा.

वृषभ

चंद्रग्रहणाचा अशुभ प्रभाव वृषभ राशीच्या लोकांवरही राहील. मन अशांत राहील. कुटुंबासोबत मतभेद होऊ शकतात, वादविवादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशा स्थितीत आपल्या बोलण्यावर संयम ठेवा आणि कोणत्याही गोष्टीची गडबड करू नका.

हे सुद्धा वाचा

तूळ

हे छाया चंद्रग्रहण फक्त तूळ राशीतच दिसेल. अशा स्थितीत ग्रहण दोषामुळे तूळ राशीच्या लोकांना नोकरी आणि कुटुंबात मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. आरोग्यावर विपरित परिणाम होईल, अशा परिस्थितीत घराबाहेर पडू नका आणि ग्रहणाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत सतत महामृत्युंजय मंत्राचा जप करा.

कर्क

मे महिन्यात होणार्‍या चंद्रग्रहणाचा कर्क राशीच्या लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होईल. त्यांना आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. नोकरदार लोकांना त्यांच्या कामात अनेक अडचणी येऊ शकतात. व्यवसायात कोणतेही नवीन पाऊल उचलू नका, अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.