Chandra Grahan : थोड्याच वेळात लागणार वर्षातले शेवटचे चंद्रग्रहण, काय होणार याचा परिणाम?

Lunar Eclipse 2023 : संध्याकाळी 4.05 वाजता चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी सुरू झाला आहे. यावेळी चंद्रग्रहण मेष राशीत होणार आहे, त्यामुळे मेष राशीत गुरु चांडाळ योग तयार होणार आहे. यासोबतच तुला राशीच्या सातव्या घरात अंगार दोषही तयार होत आहे. अशा स्थितीत मतभिन्नता वाढेल आणि मानसिक तणावही वाढेल.

Chandra Grahan : थोड्याच वेळात लागणार वर्षातले शेवटचे चंद्रग्रहण, काय होणार याचा परिणाम?
चंद्रग्रहणImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 28, 2023 | 7:00 PM

मुंबई : या वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण (Lunar Eclipse 2023) आज होणार आहे. हे चंद्रग्रहण आज शरद पौर्णिमेला होणार आहे. वर्षातील दुसरे चंद्रग्रहण आंशिक असेल. ज्योतिषशास्त्रात ग्रहण खूप महत्वाचे मानले जाते. जोतिषी मंदार पांडे यांनी याबद्दल माहिती दिली आहे.  2023 मध्ये होणार्‍या सर्व ग्रहणांपैकी हे एकमेव चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण 28 ऑक्टोबरपासून म्हणजेच आज रात्री 11:30 वाजता सुरू होईल आणि 3:56 वाजता संपेल, त्यावेळी या ग्रहणाची हलकी सावली पडण्यास सुरुवात होईल. चंद्रावर हळुहळू पृथ्वीची बोलायचे झाल्यास  ते 29 ऑक्टोबर रोजी रात्री 1:05 वाजता सुरू होईल आणि पहाटे 2:24 वाजता समाप्त होईल, ज्याचा कालावधी 1 तास 19 मिनिटे असेल. ग्रहणाची सुरुवात दुपारी 1.05 वाजता, मध्य पहाटे 1.44 वाजता आणि ग्रहणाची समाप्ती पहाटे 2.40 वाजता होईल.

जोतिषशास्त्राच्या दृष्टीने कसं असणार हे ग्रहण?

संध्याकाळी 4.05 वाजता चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी सुरू झाला आहे. यावेळी चंद्रग्रहण मेष राशीत होणार आहे, त्यामुळे मेष राशीत गुरु चांडाळ योग तयार होणार आहे. यासोबतच तुला राशीच्या सातव्या घरात अंगार दोषही तयार होत आहे. अशा स्थितीत मतभिन्नता वाढेल आणि मानसिक तणावही वाढेल. त्यामुळे ही युद्ध परिस्थिती अधिक तीव्र होणार आहे. हे देखील जगात अशांततेचे कारण बनेल. या ग्रहणाचा प्रभाव चीनवरही दिसणार आहे. तसंच या ग्रहणामुळे अमेरिका आणि रशिया यांच्यात तणाव निर्माण होऊ शकतो. मोठ्या प्रमाणावर युद्ध परिस्थिती निर्माण होऊ शकते. चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे पुढील 1 महिन्यापर्यंत आगीशी संबंधित नुकसान होण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणावर युद्धाची परिस्थिती निर्माण होत आहे.

सूर्य, मंगळ, केतू, शनि आणि राहू यांचा मेष आणि तूळ राशीशी संबंध असेल. ही परिस्थिती युद्ध आणि स्फोट दर्शवत आहे. त्यामुळे जीवितहानी व अपघात होण्याची शक्यता आहे. मध्य पूर्व, अमेरिका आणि अफगाणिस्तानलाही याचा फटका बसू शकतो. यावेळी प्रवास करताना काळजी घ्यावी.

हे सुद्धा वाचा

कुठे दिसणार चंद्रग्रहण?

हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. या वर्षीचे दुसरे चंद्रग्रहण युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, उत्तर आणि पूर्व दक्षिण अमेरिका, अटलांटिक महासागर, हिंद महासागर, अंटार्क्टिका येथेही दिसणार आहे. हे सूर्यग्रहण अश्विनी नक्षत्र आणि मेष राशीमध्ये होईल.

आंशिक चंद्रग्रहण म्हणजे काय?

जेव्हा चंद्राचा काही भाग पृथ्वीच्या सावलीत प्रवेश करतो तेव्हा आंशिक चंद्रग्रहण होते. यामध्ये असे दिसते की चंद्र पृष्ठभाग कापत आहे आणि पृथ्वीच्या जवळ असलेल्या चंद्राच्या त्या भागात पृथ्वीची सावली काळी दिसते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.