12 वर्षानंतर मेष राशीत चतुर्ग्रही योग, चार राशीच्या लोकांना बसणार धनहानीचा फटका

Chaturgrahi Yog 2023 : ज्योतिषशास्त्रात ग्रहांचं एका राशीतून दुसऱ्या राशीत जाणं तसेच युती आघाड्यांमुळे मानवी जीवनावर परिणाम होतो. मेष राशीत अशीच काहीसी स्थिती असणार आहे. ग्रहमान अनुकूल नसल्याने काही राशींना फटका बसू शकतो.

12 वर्षानंतर मेष राशीत चतुर्ग्रही योग, चार राशीच्या लोकांना बसणार धनहानीचा फटका
मेष राशीत ग्रहांची मोठी उलथापालथ, चार ग्रहांच्या युतीमुळे या राशींचं होणार आर्थिक नुकसान
Follow us
| Updated on: Apr 06, 2023 | 2:38 PM

मुंबई – एप्रिल महिना ग्रहांच्या गोचराच्या दृष्टीकोनातून खूपच महत्त्वाचा आहे. सर्वात मोठा ग्रह म्हणजेच गुरु ग्रह आपलं स्थान बदलणार आहे. मेष राशीत वर्षभरासाठी आपलं बस्तान बसवणार आहे. त्यामुळे काही ग्रहांसोबत युती आघडी होणार आहे. विशेष म्हणजे मेष राशीत चतुर्ग्रही योग जुळून येणार आहे. मंगळाचं स्वामित्व असलेल्या मेष राशीत चार ग्रह एकत्र येणार आहेत. या राशीत राहु आणि बुध ग्रह आधीच ठाण मांडून आहेत. त्यानंतर 14 एप्रिलला सूर्य आणि 22 एप्रिलला गुरु ग्रह मेष राशीत प्रवेश करेल.

बारा वर्षानंतर मेष राशीत चार ग्रहांची युती होणार आहे. यामुळे काही राशींना शुभ तर काही राशींना अशुभ परिणाम भोगावे लागणार आहेत. मेष राशीतील चतुर्ग्रही योगामुळे कोणत्या राशींना काळजी घेण्याची गरज आहे वाचा

चतुर्ग्रही योगामुळे या राशींचं टेन्शन वाढणार

वृषभ – मेष राशीत तयार होणाऱ्या चतुर्ग्रही योगामुळे या राशीच्या लोकांना त्रास होऊ शकतो. होणारी कामं रखडल्याचा अनुभव तुम्हाला येईल. त्यामुळे कामावर लक्ष केंद्रीत करा. विनाकारण पैसा खर्च करू नका. जोडीदारासोबत काही वाद होण्याची शक्यता आहे. रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. कुटुंबासोबत एखाद्या प्रसंगाबाबत मनमोकळेपणाने बोला.

सिंह – या राशीच्या जातकांना चतुर्ग्रही योगाचा जबरदस्त फटका बसेल असं चित्र आहे. व्यवसायात तुम्हाला चढ उतार दिसून येईल. कामाच्या ठिकाणी नवी जबाबदारी मिळू शकते. त्यामुळे डोकेदुखी वाढेल. तसेच कामाच्या बाबतीत मोठा निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्या. कारण तुमच्या चुकीच्या निर्णयाचा संधीसाधू लोकं फायदा उचलतील.

तूळ – या राशीवर ग्रहांचा सकारात्मक परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे या जातकांना संमिश्र अनुभव मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल आणि पदोन्नती होण्याची शक्यता आहे. पण जबाबदारीच्या ओझ्याखाली पूर्णपणे दबून जाल. त्यामुळे पूर्णपणे कामावर लक्ष केंद्रीत करावं लागेल. विनाकारण पैशांची उधलपट्टी होईल. वैवाहिक जीवनात काही अडचणी येऊ शकतात. कुटुंबातील वाद शांततेने सोडवा.

कुंभ – या राशीच्या जातकांना चतुर्ग्रही योगामुळे त्रास होईल. विनाकारण पैसा खर्च होताना दिसेल. मात्र कितीही केलं तरी सेव्हिंग करण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी हवा तसा मोबदला मिळणार नाही. त्यामुळे कामात मन लागणार नाही. पण असं असलं तरी आत्मविश्वास ढासळू देऊ नका. भविष्यात केलेल्या कामाचं चीज होईल. नवे मित्र तुमच्या आयुष्यात आनंद भरतील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा.
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?.
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल.
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा.
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल.
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल.