Chaturmas 2022: या दिवशीपासून योगनिद्रेत जाणार भगवान विष्णू; कोणत्या राशींवर काय परिणाम होणार?
सनातन धर्मात प्रत्येक महिन्याचे व्रत आणि सण यांचे विशेष महत्त्व आहे आणि म्हणूनच धर्मग्रंथातही त्यांचा तपशीलवार उल्लेख करण्यात आला आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार वर्षातील चौथा महिना, ज्याला आषाढ महिना (Aashadh month) असे म्हणतात. या दरम्यान चातुर्मास (chaturmas 2022) देखील सुरू होतो. ज्याचा केवळ भगवान विष्णूशीच नाही तर इतर देवतांशीही विशेष संबंध असल्याचे मानले जाते. शास्त्रानुसार चातुर्मासात […]
सनातन धर्मात प्रत्येक महिन्याचे व्रत आणि सण यांचे विशेष महत्त्व आहे आणि म्हणूनच धर्मग्रंथातही त्यांचा तपशीलवार उल्लेख करण्यात आला आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार वर्षातील चौथा महिना, ज्याला आषाढ महिना (Aashadh month) असे म्हणतात. या दरम्यान चातुर्मास (chaturmas 2022) देखील सुरू होतो. ज्याचा केवळ भगवान विष्णूशीच नाही तर इतर देवतांशीही विशेष संबंध असल्याचे मानले जाते. शास्त्रानुसार चातुर्मासात भगवान विष्णू आणि इतर देवता योगनिद्रात जातात आणि चार महिन्यांनी ते जागे होतात. ज्या दिवशी भगवान विष्णू आणि देवता जागे होतात त्याला देवउठी एकादशी म्हणतात. यावेळी चातुर्मास 10 जुलैपासून सुरू होत असून 4 नोव्हेंबरला संपणार आहे. या काळात देव जरी योगनिद्रामध्ये जात असले तरी लोकं त्यांना उपासनेद्वारे प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. भगवान विष्णूही या काळात आपल्या भक्तांची काळजी घेतात. असे मानले जाते की, जाणून घेऊया या काळात कुठल्या राशींना विशेष लाभ मिळणार आहे.
- मेष- चातुर्मासात या राशीच्या लोकांना करिअरमध्ये यश मिळू शकते. मेष राशींच्या लोकांवर भगवान विष्णूची विशेष कृपा राहील. या राशीच्या लोकांनी सकाळी उठून स्नान करून भगवान विष्णूची पूजा करावी. याशिवाय गुरुवारी संध्याकाळी तेलाचा दिवा लावावा. या काळात कुठलेही शुभ कार्य किंवा वाहन खरेदी करणे टाळावे. देवउठीनंतरच अशी कामे करावी.
- वृश्चिक- चातुर्मासात या राशीच्या लोकांवर भगवान विष्णूची कृपा राहते. या काळात वृश्चिक राशीच्या लोकांना व्यवसायात भरपूर यश मिळते. या राशीच्या लोकांनी भगवान विष्णू आणि सूर्याची उपासना करावी. सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे.
- कर्क- या राशीच्या लोकांना चातुर्मासात फायदा होऊ शकतो, परंतु त्यांना वादालाही सामोरे जावे लागू शकते. असे मानले जाते की कर्क राशीच्या लोकांचे या काळात मित्रांसोबत भांडण होऊ शकते. आर्थिक बाबींचा विचार केल्यास त्यांना व्यवसायात नफा देखील मिळू शकतो. या काळात कुठलीही मोठी गुंतवणूक टाळावी.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)