Daily Horoscope 12 July 2022: ‘या’ राशीच्या लोकांनी आज मोठे व्यवहार टाळावे

| Updated on: Jul 12, 2022 | 6:00 AM

मेष- आज आर्थिक प्रकरणं मार्गी लागतील. धार्मिक कामांमध्ये सहभागी होण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. कुटुंबाला वेळ द्याल. वृषभ- एखादं नवं काम मिळण्याची शक्यता आहे. आजचा दिवस अडकलेले सर्व व्यवहार मार्गी लागतील. कोणा जवळच्या व्यक्तीचं मन दुखावू नका. वाद मिटवा.  मिथुन- आज आरोद्याची काळजी घ्या. धावपळ करु नका. दिवस आनंदाचे आहेत. आयुष्यात आनंदाची बरसात होणार आहे. […]

Daily Horoscope 12 July 2022: या राशीच्या लोकांनी आज मोठे व्यवहार टाळावे
जोतिषशास्त्र
Follow us on
  1. मेष- आज आर्थिक प्रकरणं मार्गी लागतील. धार्मिक कामांमध्ये सहभागी होण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. कुटुंबाला वेळ द्याल.
  2. वृषभ- एखादं नवं काम मिळण्याची शक्यता आहे. आजचा दिवस अडकलेले सर्व व्यवहार मार्गी लागतील. कोणा जवळच्या व्यक्तीचं मन दुखावू नका. वाद मिटवा.
  3.  मिथुन- आज आरोद्याची काळजी घ्या. धावपळ करु नका. दिवस आनंदाचे आहेत. आयुष्यात आनंदाची बरसात होणार आहे. धनलाभ होण्याची संधी आहे.
  4. कर्क- कामातील काही गोष्टींकडे गांभीर्यानं पाहा, अडकलेले पैसे परत मिळण्याची संधी आहे. वेळ व्यर्थ जाणार नाही याकडे लक्ष द्या.
  5. हे सुद्धा वाचा
  6.  सिंह – कोरोना फोफावतोय, आरोग्याची काळजी घ्याय कारण नसल्यास उन्हात बाहेर पडू नका. आजचा दिवस शुभ आहे.
  7. कन्या- सद्यस्थिती पाहता भविष्यातील बेत आखत त्या मार्गानं काम करण्यासाठी योग्य वेळ आहे. आताच आराखडा तयार करा, भविष्य घडवण्याची संधी तुमच्या हाती आहे.
  8.  तुळ- शरीरात कोणत्याही प्रकारचं दुखणं असल्यास चिंता करु नका, दुखणं दूर होणार आहे. आरोग्य जपा, धार्मिक कामांमध्ये सहभागी व्हा.
  9. वृश्चिक- मोठे व्यवहार टाळा. आज शक्यतो आराम करा. अधिकचा ताण घेऊ नका. गोष्टी मनाजोग्या होतील फक्त थोडा वेळ द्या.
  10. धनु- व्यापारामध्ये लाभ होणार आहे. व्यवसायाच्याच निमित्ताने प्रवास करण्याचा योग आहे. आज कुटुंबातील काही व्यक्तींशी चांगला संवाद साधू शकाल.
  11. मकर- वडिलांच्या संपत्तीतील काही भाग आज तुम्हाला मिळणार आहे. अट्टहास आणि अपेक्षा ठेवू नका, येणाऱ्या गोष्टींचा स्वीकार करा.
  12. कुंभ – नोकरीच्या ठिकाणी आजचा दिवस आनंदाचा आहे. धनलाभ होणार आहे. आज आपल्या लोकांसोबत वेळ घालवा. एखाद्या ठिकाणी भटकंतीचा योग आहे.
  13. मीन- नोकरीच्या ठिकाणी आज कामाचा ताण जरा जास्त असेल. परिस्थिती हाताबाहेर जाऊ देऊ नका. शांत चित्ताने एक एक काम मार्गी लावा.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)