Daily Horoscope 17 June 2022: ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार आज आर्थिक पाठबळ; असा जाणार तुमचा आजचा दिवस
मेष- नवी आणि जास्त पगाराची नोकरी आज तुमच्या वाट्याला येणार आहे. संधी ओळखा, तिचं सोनं करा. वरिष्ठांचा विश्वास सार्थ ठरवा. वृषभ – कुटुंबीयांसमवेत एखाद्या नव्या गोष्टीचा अनुभव घेण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. अडकलेली कामं मार्गी लागणार आहेत. मिथुन- कामाच्या ठिकाणी असणारे मतभेद आणि गैरसमज आज दूर होणार आहेत. वरिष्ठांचं सहकार्य तुम्हाला मिळणार आहे. आज तुमच्या […]
- मेष- नवी आणि जास्त पगाराची नोकरी आज तुमच्या वाट्याला येणार आहे. संधी ओळखा, तिचं सोनं करा. वरिष्ठांचा विश्वास सार्थ ठरवा.
- वृषभ – कुटुंबीयांसमवेत एखाद्या नव्या गोष्टीचा अनुभव घेण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. अडकलेली कामं मार्गी लागणार आहेत.
- मिथुन- कामाच्या ठिकाणी असणारे मतभेद आणि गैरसमज आज दूर होणार आहेत. वरिष्ठांचं सहकार्य तुम्हाला मिळणार आहे. आज तुमच्या कामाचं चीज होणार आहे.
- कर्क- सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असाल तर आज चांगली संधी तुम्हाला मिळणार आहे. नोकरीच्या नव्या संधी तुमच्या आयुष्याला कलाटणी देणार आहे.
- सिंह- जोडीदाराच्या मदतीनं आज तुम्ही एक मोठा टप्पा ओलांडणार आहात. आयुष्याच्या सुखद पर्वाची आजपासून सुरुवात होणार आहे. पाय जमिनीवरच राहू द्या.
- कन्या- आवडीचे पदार्थ खाण्याचा आणि इतरांना खाऊ घालण्याचा आज दिवस आहे. कोणत्यागी गोष्टीची अती चिंता बरी नाही. वर्तमानात जगा.
- तुळ- नोकरीच्या शोधात असणाऱ्यांचा शोध आज अखेर संपणाकर आहे. उष्णतेचा त्रास होईल. जुने मित्र भेटतील.
- वृश्चिक – तरुणांनी नव्या वादांमध्ये न अडकलेलं बरं. नव्या घराचा विचार कराल. ते खरेदी करण्याचाही विचार कराल. आर्थिक पाठबळ मिळाल्यामुळं मोठा दिलासा असेल.
- धनु- अती राग करु नका. परिस्थितीचा सारासार विचार करुन निर्णय घ्या. मोठ्यांचा सल्ला आणि त्यांचे आशीर्वाद आज तुम्हाला नव्या वाटेवर नेणार आहेत. त्यांची साथ सोडू नका.
- मकर – आपल्या लोकांची साथ मिळेल. वडिलांचा सल्ला आज तुम्हाला मोठं यश देणार आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करा.
- कुंभ- धनलाभाचा योग आहे. नोकरीमध्ये आजचा दिवस बरंच यश आणणारा ठरेल. वरिष्ठांकडून शाबासकीची थाप मिळेल. कामातून वेळ काढून स्वत:लाही वेळ द्या.
- मीन- एखादी शुभवार्ता तुम्हाला कळेल. रागावर ताबा ठेवा. तिखट तेलकट पदार्थ टाळा. रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका.
हे सुद्धा वाचा
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)