Dhanraj Yog : बुध आणि सूर्याच्या युतीमुळे धनराज योग, चार राशींच्या जातकांवर असेल देवी लक्ष्मीची कृपा

Astrology : पंचांग आणि त्याची पद्धत काही ठिकाणी वेगळी आहे. त्यामुळे ग्रहांचा गोचर कालावधी पाठीपुढे असतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि बुधाची युती कन्या राशीत होत आहे. त्यामुळे धनराज योग तयार होणार आहे. यामुळे चार राशीच्या जातकांना लाभ मिळेल.

Dhanraj Yog : बुध आणि सूर्याच्या युतीमुळे धनराज योग, चार राशींच्या जातकांवर असेल देवी लक्ष्मीची कृपा
बुधादित्य योग
Follow us
| Updated on: Sep 28, 2023 | 3:09 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून ऑक्टोबर महिना खूपच महत्त्वाचा आहे. कारण या महिन्यात ग्रहांची दीर्घकालीन उलथापालथ होणार आहे. महिन्याच्या सुरुवातीपासून ग्रहांच्या स्थितीत बदल दिसून येणार आहे. सूर्य, बुध, शुक्र, मंगळ, राहु, केतु हे ग्रह राशी बदल करणार आहेत. त्यामुळे राशीचक्रावर त्याचा परिणाम दिसून येईल. राशीच्या जातकांना सकारात्मक, तर काही राशीच्या जातकांना नकारात्मक परिणाम भोगावे लागू शकतात. 1 ऑक्टोबरला बुद्धी आणि उद्योगाचा कारक असलेला बुध ग्रह स्वरास असलेल्या कन्येत प्रवेश करणार आहे. या राशीत सूर्यदेव विराजमान आहेत. त्यामुळे बुध आणि सूर्याची युती होईल. यामुळे शुभ योग तयार होणार आहे. 1 तारखेला बुध ग्रहाने गोचर करताच भद्र राजयोग तयार होईल.

सूर्य आणि बुधाची युती शुभ मानली जाते. यामुळे बुधादित्य राजयोगही तयार होणार आहे. हे दोन्ही योग ज्योतिषशास्त्रात शुभ मानले गेले आहेत. त्यामुळे राशीचक्रातील काही राशींना शुभ परिणाम दिसून येतील. चला जाणून घेऊयात बुधादित्य राजयोग आणि भद्र राजयोगामुळे कोणत्या राशींना लाभ मिळणार ते..

या राशीच्या जातकांना मिळणार लाभ

वृषभ : कन्या राशीतील दोन राजयोगाचा फायदा वृषभ राशीच्या जातकांना होईल. या राजयोगाच्या प्रभावामुले नोकरी आणि उद्योग व्यवसायात चांगले परिणाम दिसून येतील. या कालावधीत खूप कमाई होईल. या दरम्यान अचानक धनलाभ होऊ शकतो. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळेल. कुटुंबाचा उत्तम साथ मिळेल आणि किचकट प्रश्न सुटतील.

सिंह : सूर्य आणि बुधाची युतीमुळे या राशीच्या जातकांना नशिबाची जोरदार साथ मिळेल. यामुळे आर्थिक अडचणी दूर होतील. व्यवसाय करणाऱ्या जातकांना विशेष फायदा होईल. तसेच शेअर बाजार आणि लॉटरीतून अचानक धनलाभ होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण राहील. हाती घेतलेलं काम पटकन पूर्ण होईल.

तूळ : ऑक्टोबर महिना तूळ राशीच्या जातकांना चांगला जाईल. नोकरीत प्रमोशन मिळू शकतं. तसेच पगारावत वाढ होण्याची शक्यता आहे. आई वडिलांकडून उत्तम साथ मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा काळ अनुकूल असेल. नोकरीची संधी या काळात मिळू शकते. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल.

धनु : सूर्य आणि बुधाच्या युतीमुळे घरात सकारात्मक वातावरण राहील. व्यवसायात अडकलेली कामं मार्गी लागतील. एखादा जोडधंदा मिळाल्याने आर्थिक भरभराट होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची उत्तम साथ मिळेल. तसेच काही महिन्यांपूर्वी साडेसातीतून सुटका झाली आहे. त्यामुळे आता त्याचा प्रभाव दूर होताना दिसेल. गरीब आणि गरजू व्यक्तींना मदत करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.