Diwali 2023 : दिवाळीत 500 वर्षानंतर जुळून येत आहे 4 योगायोग, काय लाभ होणार?

कालपासून दिवाळीला सुरूवात झाली आहे. दिवाळी हा सण देवी लक्ष्मी आणि गणेशाच्या पूजेला समर्पित मानला जातो. ज्योतिषांच्या मते, उत्तम लाभ मिळवण्यासाठी दिवाळीच्या प्रदोष काळात लक्ष्मी-गणेशाची पूजा करावी. यावेळी 12 नोव्हेंबर रोजी प्रदोष काल संध्याकाळी 5:28 पासून सुरू होईल आणि रात्री 8 पर्यंत चालेल.

Diwali 2023 : दिवाळीत 500 वर्षानंतर जुळून येत आहे 4 योगायोग, काय लाभ होणार?
लक्ष्मी पुजाImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 11, 2023 | 8:33 AM

मुंबई : काल धनत्रयोदशीपासून दिवाळीला सुरूवात झाली. आज दिवाळीचा (Diwali 2023) दूसरा दिवस आहे. दिवाळी हा भारतीय संस्कृतीतील सर्वात महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी देवी लक्ष्मी आणि गणपतीची पूजा केली जाते, ज्यांच्या कृपेने घरात वर्षभर संपत्ती आणि समृद्धी राहते. ज्योतिषांच्या मते यावेळी दिवाळीत 500 वर्षानंतर दुर्मिळ योगायोग तयार होत आहेत. या योगायोगांमुळे जातकांना धन, समृद्धी, आरोग्य आणि आर्थिक लाभ प्राप्त होतील. जोतिषी पराग कुळकर्णी यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

काय आहे हा दूर्मिळ योगायोग?

मराठी दिनदर्शिकेनुसार, या वेळी दिवाळी रविवारी, 12 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाईल. सनत धर्माच्या अभ्यासकांच्या मते या दिवशी दुर्धारा, हर्ष, उभयचारी योग आणि गजकेसरी योग तयार होत आहेत. असा अद्भुत योगायोग 500 वर्षांनंतर घडत आहे. असा दुर्मिळ योगायोग अत्यंत शुभ मानला जातो. अशा दुर्मिळ संयोगाने लोकांच्या जीवनात आनंद येतो आणि प्रलंबित कामे पूर्ण होऊ लागतात.

अमावस्येचा काळ किती असेल?

ज्योतिषांच्या मते, लक्ष्मी पूजा प्रदोष काळात सूर्यास्ताच्या वेळी अमावस्येला केली जाते. या वेळी अमावस्या तिथी 12 नोव्हेंबर रोजी दुपारी 2:44 पासून सुरू होईल आणि 13 नोव्हेंबर रोजी दुपारी 2:56 पर्यंत चालेल. त्यामुळे यंदा दिवाळीचा सण १२ नोव्हेंबरलाच साजरा होणार आहे.

हे सुद्धा वाचा

या शुभ मुहूर्तावर लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केली जाईल

दिवाळी हा सण देवी लक्ष्मी आणि गणेशाच्या पूजेला समर्पित मानला जातो. ज्योतिषांच्या मते, उत्तम लाभ मिळवण्यासाठी दिवाळीच्या प्रदोष काळात लक्ष्मी-गणेशाची पूजा करावी. यावेळी 12 नोव्हेंबर रोजी प्रदोष काल संध्याकाळी 5:28 पासून सुरू होईल आणि रात्री 8 पर्यंत चालेल.

पूजा करताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • दिवाळीत लक्ष्मीची पूजा करताना देवीसमोर तुपाचे आणि तेलाचे दोन्ही दिवे लावले जातात. शास्त्रानुसार दिवाळीला देवी लक्ष्मीसमोर डाव्या हाताला तुपाचा दिवा लावावा, तर उजव्या हाताला तेलाचा दिवा लावावा.
  • तुपाचा दिवा पांढऱ्या उभ्या वातीने म्हणजेच फुलवातीने पेटवावा. तेलाच्या दिव्याची वात लांब असावी. कोणत्याही पूजेचे विशेष फल प्राप्त करण्यासाठी तिळाच्या तेलाचा दिवा लावावा.
  • पूजेच्या वेळी लावलेला दिवा मध्यभागी विझू नये आणि हा दिवा नेहमी देवाच्या मूर्तीसमोर ठेवावा.
  • दिवाळीत किंवा नियमित पूजेत कधीही तुटलेला दिवा वापरू नये.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.