तुमच्याकडे यंदा कर्तव्य आहे? 2024 मध्ये लग्नाचे किती मुहूर्त जाणून घ्या
चातुर्मास संपल्यामुळे लग्न सराईचा हंगाम आला आहे. लग्नाचा हंगाम असल्याने शुभ मुहूर्तासाठी अनेक जण पंचांग खरेदी करत आहेत. 2024 मध्ये आज आपण कोणकोणते शुभ मुहूर्त आहेत ते जाणून घेऊया.
मुंबई : हिंदू धर्मात लग्न हे ठराविक महिन्यात आणि शुभ काळातच केले जातात. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे, मात्र पुढील आठवड्यापासून खरमासामुळे काही काळ लग्नसराईला ब्रेक लागणार आहे. अशा परिस्थितीत, पुढील वर्षी म्हणजे 2024 मध्ये लग्नासाठी कोणत्या महिन्यांत शुभ मुहूर्त आहेत आणि कोणत्या दिवशी तुमचे लग्न होऊ शकते हे जाणून घ्या. जेणेकरून तुमच्याघरी यंदा कर्तव्य असेल तर लग्नासाठी (Vivah Muhurat 2024) मंगल कार्यालय, गुरूजी आणि बँन्डवाल्यांच्या तारखा तुम्हाला घेता येईल. 2024 मध्ये लग्नासाठी हे सर्वात शुभ मुहूर्त आहेत.
24 वर्षांनंतर मे-जूनमध्ये एकही विवाह होणार नाही
जर आपल्याला 2024 मध्ये लग्नाच्या हंगामाबद्दल बोलायचे झाल्यास मे आणि जून महिन्यात एकही शुभ मुहूर्त नाही. वास्तविक या दोन महिन्यांत शुक्र ग्रह अस्त होणार आहे, त्यामुळे मे आणि जूनमध्ये लग्न होऊ शकत नाही. यानंतर जुलैमध्ये शुक्राचा उदय होईल, त्यानंतर जुलै महिन्यात लग्न होऊ शकते. 2000 च्या सुरुवातीला अशी परिस्थिती निर्माण झाली होती. ज्योतिषांच्या मते, शुक्र आणि गुरूचा उदय विवाहासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण हे दोन्ही ग्रह लग्नासाठी कारक आहेत. या वर्षी शुक्र ग्रह 23 एप्रिल 2024 ते 29 जून 2024 या कालावधीत मावळेल. त्याच वेळी, गुरु देखील 6 मे 2024 पासून मावळेल, जो 2 जून 2024 रोजी उदय होईल.
2024 मध्ये केवळ 77 विवाह शुभ मुहूर्त आहेत
पुढील वर्षी म्हणजे 2024 मध्ये लग्नासाठी एकूण 77 शुभ मुहूर्त आहेत, त्यापैकी सर्वात जास्त शुभ मुहूर्त फेब्रुवारीमध्ये आहे. फेब्रुवारीतील 20 दिवस लग्नासाठी शुभ आहेत, तर लग्नासाठी शुभ मुहूर्त जुलै नंतर थेट नोव्हेंबरमध्ये आहेत. दुसरीकडे, जर आपण वर्ष 2023 बद्दल बोलायचे झाल्यास तर या वर्षी लग्नासाठी 81 शुभ मुहूर्त होते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही 2024 मध्ये तुमच्या लग्नाची योजना आखत असाल तर तारीख, ठिकाण आणि सर्व व्यवस्था अगोदरच करा, कारण लग्नासाठी शुभ मुहूर्त कमी असल्यामुळे एका दिवसात अनेक विवाह होऊ शकतात.