”कितीही संकटं आली तरी आभाळावर पाय ठेवून उभा राहीन,”असंच म्हणाऱ्या यूक्रेनचे अध्यक्ष वलोदोमीर झेलेन्स्की यांची राशी कोणती माहिती आहे?
युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताकडून मदत मागितली आहे. पण या संकटकाळात भक्कमपणे उभे राहणाऱ्या झेलेन्स्किंची रास तुम्हाला माहित आहे का ?
मुंबई : रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine War) सध्या जगात चिंतेचे वातावरण बघायला मिळत आहे. अशात युक्रेन एकटा पडल्याचे दिसत होते. आता युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताकडून मदत मागितली आहे. पण या संकटकाळात भक्कमपणे उभे राहणाऱ्या वलोदोमीर झेलेन्स्कीची रास तुम्हाला माहित आहे का ? वलोदोमीर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांचा जन्म 25 जानेवारी 1978 रोजी झाला आहे. ज्या लोकांचा जन्म 20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी या काळात झालेला असतो. त्यांची रास कुंभ (kumbha Rashi) असते. या राशीचा स्वामी शनि असतो. या राशीच्या व्यक्तींचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या व्यक्ती अतिशय बुद्धिमान असतात. तसंच यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. या व्यक्ती शांतताप्रिय असून अत्यंत विचारी असतात. चला तर जाणून घेऊयात.
- ‘आत्मविश्वासानेच यश प्राप्त होते’ ही गोष्ट आपण नेहमी ऐकतो पण कुंभ राशीमध्ये आत्मविश्वास हा अत्यंत ठासून भरलेला असतो. यामुळेच त्यांचे व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्य अतिशय उत्तम असते. या महिन्यात जन्मलेल्या जास्तीत जास्त व्यक्ती या बुद्धिमान असतात. त्यामुळे लेखन, परीक्षण आणि तांत्रिकी क्षेत्रामध्ये या व्यक्तींचा बोलबाला दिसून येतो. त्यामुळेच व्होदिमर झेलेन्स्की हे उत्तम कॉमेडीयन होते.
- कुंभ राशीच्या व्यक्ती आपली बुद्धी नको त्या गोष्टीत खर्च करत नाहीत. एका गोष्टीवर लक्ष केंद्रीत करून मगच ती गोष्ट मिळविण्याच्या मागे या व्यक्ती लागतात.
- या व्यक्ती जितक्या लाजाळू असतात तितक्याच रोमँटिक देखील असतात. प्रेम या भावनेवरच या व्यक्तींचे प्रेम अधिक असते. आपली सर्व संवेदनशीलता आणि काळजी प्रेमामध्ये या व्यक्ती दाखवतात. त्यामुळे यांना बरेचदा प्रेमात धोकाही मिळतो.
- या व्यक्तींना प्रेम व्यक्त करण्यसााठी शब्द, विचार आणि इतर गोष्टींची मदत लागत नाही. कारण यांना आपल्या जोडीदाराचे विचार त्यांच्या कृतीतूनदेखील समजतात. या व्यक्ती नेहमी एकमेकांपासून प्रभावित असतात.
- कुंभ राशीच्या व्यक्ती या अधिकतम दिलदार स्वभावाच्या असतात. कंजुपणा करणे या व्यक्तींना जमत नाही. प्रसिद्धी मिळवण्यासाठीच या व्यक्ती जन्माला येतात असं म्हणावं लागेल कोणत्याही व्यक्तीवर पटकन विश्वास ठेवणे या हा या व्यक्तींचा दोष आहे. त्यामुळे यांच्या चांगुलपणाचा अनेक लोक फायदा उचलतात. त्याशिवाय यांच्या भावनाही दुखावल्या जातात.
- नशीबापेक्षा कर्मावर विश्वास ठेवणे या लोकांना अधिक आवडते. कोणत्याही कपटी माणसांपासून दूर राहणे यां व्यक्तींना जा्स्त योग्य वाटते. कोणाचेही मन दुखावणे या व्यक्तींना शक्य होत नाही.
संबंधीत बातम्या :
सर्व अपुऱ्या इच्छा पूर्ण होतील, केशराचे हे उपाय नक्की करुन पाहा
महादेवाच्या पंचाक्षर स्तोत्राने अशक्य गोष्टी शक्य होतील, महाशिवरात्रीला ‘हा’ पाठ नक्की वाचा!