Daily Horoscope 01 June 2022: टेंशन घेऊ नका, आजचा दिवस उत्तम
आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल ? आजचे तारे काय सांगतात. दैनिक राशी भविष्याद्वारे आजचे राशी भविष्य आणि दिवसातील घडामोडीची माहिती जाणून घ्या.
मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीची रास त्याच्या जन्मतारीख आणि जन्मवेळेवर आधारित असते. ज्योतिषशास्त्रात (Astrology) 27 नक्षत्र, 9 ग्रह आणि 12 राशींचे वर्णन केले आहे. याआधारावर व्यक्तीची रास (Zodiac) ठरवली जाते. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? आजचे तारे काय म्हणतात? दैनिक राशिभविष्याद्वारे आजचे राशीभविष्य आणि संपूर्ण दिवसातील घडामोडींची माहिती जाणून घेवूया.
तुळ (Libra) –
तुम्ही सकारात्मक दृष्टीकोनातून जीवन समजून घेण्याचा प्रयत्न करत आहात ही एक मोठी उपलब्धी आहे. तुमचा धर्म आणि अध्यात्मावरचा विश्वास तुमच्यात शांती आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल.जवळच्या नातेवाईक किंवा मित्राशी मतभेद होऊ शकतात, त्यामुळे इतरांच्या कामात ढवळाढवळ करू नका. आणि विचारल्याशिवाय सल्लाही देऊ नका. विद्यार्थी अभ्यासात लक्ष न देता प्रवासात वेळ वाया घालवतील. तसं करू नये. आज तुमच्या कामता कमी वेळ जाईल. परंतु तुम्हाला फोनवरून महत्त्वाच्या ऑर्डर मिळू शकतात, त्यामुळे सावधगिरी बाळगा. नोकरदार व्यक्तींना कामाच्या व्यापामुळे ओव्हरटाईम करावा लागू शकतो.
लव फोकस- कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आणि स्वतःसाठी थोडा वेळ देऊन तुम्हाला आराम वाटेल.
खबरदारी- आरोग्य चांगले राहील. त्यामुळे कशाचीही काळजी करू नका. फक्त दिनचर्या व्यवस्थित ठेवा.
शुभ रंग – गुलाबी
भाग्यवान अक्षर – नाही
अनुकूल क्रमांक – 6
वृश्चिक (Scorpio) –
घराचे नूतनीकरण किंवा बदलाशी संबंधित काही महत्त्वाच्या योजना आखल्या जातील. यासाठी वास्तूशी संबंधित नियमांचे पालन करणे योग्य राहील. संपत्ती किंवा इतर कोणत्याही मुद्द्यावर कुटुंबात जो गैरसमज सुरू होता, तो आज कोणाच्या तरी मध्यस्थीने दूर होऊ शकतो.घरातील वरिष्ठ आणि अनुभवी लोकांचा सल्ला फायदेशीर ठरेल, परंतु अनोळखी व्यक्तींचे कोणतेही वर्तन किंवा सल्ला घेणे टाळा. कोणाशीही अपशब्द वापरू नका, त्यामुळे नाते बिघडू शकते.कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम मिळण्याची शक्यता नाही. आता कामाशी संबंधित काही धोरणे बदलण्याची गरज आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींकडून काही महत्त्वाचे काम करून घेतल्याने कंपनीला फायदा होईल. ज्यामुळे त्यांना बक्षीसही मिळू शकते.
लव फोकस- पती-पत्नीमधील संबंध सकारात्मक आणि सहकार्याने परिपूर्ण असतील. प्रेमसंबंध मर्यादित ठेवा.
खबरदारी- बदलत्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
शुभ रंग – निळा
भाग्यवान अक्षर – म
अनुकूल क्रमांक – 9
धनु (Sagittarius)-
काही काळापासून सुरू असलेल्या समस्यांचे निराकरण झाल्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहील. आणि परस्पर संबंध अधिक दृढ होतील. एखाद्याला बऱ्याच काळापासून रखडलेले पेमेंट देखील मिळू शकते. त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली होईल.शेजाऱ्यांशी अजिबात वाद घालू नका. कारण यावेळी न्यायालयीन खटले, पोलीस कारवाई अशी परिस्थिती निर्माण होत आहे. तरुणांनी त्यांच्या करिअरबाबत अधिक जागरूक राहायला हवे. निष्काळजीपणामुळे, तो स्वतःचे नुकसान करू शकतो.नोकरदारामुळे आज कामाच्या ठिकाणी तणाव निर्माण होऊ शकतो. अनुभवी व्यक्तीशी सल्लामसलत करणे चांगले होईल, यामुळे नक्कीच काहीतरी योग्य तोडगा निघेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तीने आपल्या वरिष्ठांशी संबंध बिघडू नयेत.
लव फोकस- व्यस्ततेमुळे तुम्ही कुटुंबाला वेळ देऊ शकणार नाही. पण घरातील सर्व सदस्य तुमच्या समस्या समजून घेतील आणि तुम्हाला सहकार्य करतील.
खबरदारी- तणाव आणि थकवा यांचाही तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल. त्यामुळे संयम आणि विवेक असणे अत्यंत आवश्यक आहे.
शुभ रंग – नारिंगी
भाग्यवान अक्षर – स
अनुकूल क्रमांक – 3
लेखकाबद्दल: डॉ. अजय भांबी हे ज्योतिषशास्त्रातील एक प्रसिद्ध नाव आहे. डॉ. भांबी हे नक्षत्र ध्यानाचे विशेषज्ञ आणि उपचार करणारे देखील आहेत. पंडित भांबी यांची ज्योतिषी म्हणून ख्याती जगभर पसरली आहे. त्यांनी इंग्रजी आणि हिंदी भाषेत अनेक पुस्तके लिहिली आहेत. ते अनेक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रे आणि मासिकांसाठी लेखही लिहितात.थायलंडच्या उपपंतप्रधानांच्या हस्ते बँकॉकमध्ये वर्ल्ड आयकॉन अवॉर्ड 2018 ने त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांना अखिल भारतीय ज्योतिष परिषदेत जीवनगौरव पुरस्कारही मिळाला आहे.
(टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा.)