Vastu Tips: सकाळी या गोष्टी पाहिल्याने दिवस होतो खराब, जाणून घ्या काय सांगतं शास्त्र
Vastu Shastra: वास्तुशास्त्रात अनेक बाबींवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. प्रत्येक वस्तूंचा आपल्यावर प्रभाव पडत असतो. त्यामुळे काही गोष्टी सकाळी उठल्या उठल्या बघणं टाळणं आवश्यक आहे.
मुंबई- हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टींचं एक शास्त्र सांगितलं गेलं आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत वास्तूशास्त्रात नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचं व्यवस्थितरित्या पालन केल्यास दिवस सुखकर जातो. अन्यथा कोणतंच काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही. सकाळी उठल्या उठल्या आपल्या दिवसाची सुरुवात होते. दिवस आनंदी जाण्यासाठी आपल्याला सकारात्मक उर्जेची आवश्यकता असते. दिवसाची सुरुवात चांगली व्हावी यासाठी सकाळी उठल्या उठल्या देवाचं नाव घ्यावं.दिवसाची सुरुवातच नकारात्मक उर्जेने झाली तर मात्र प्रत्येक मिनिटं नकोसा होतो. इतकंच काय तर रात्रीची झोपंही नीट लागत नाही. सकाळी उठल्या उठल्या काही चुकीच्या गोष्टी पाहिल्यानंतर त्याचा परिणाम संपूर्ण दिवसावर होतो. अशाच नकारात्मक गोष्टींबाबत वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. त्यामुळे रोज सकाळी उठण्यापूर्वी या गोष्टी बघणं टाळणं गरजेचं आहे. तसेच सकाळी काय करायचं आहे, याचं नियोजन देखील रात्री झोपण्यापूर्वी करणं गरजेचं आहे. चला तर जाणून घेऊयात वास्तुशास्त्र नेमकं काय सांगतं…
आरशात बघू नका: सकाळी उठल्या उठल्या आरशात बघू नका. कारण बघणं अशुभ मानलं जातं. झोपेतून उठल्यानंतर आरशात बघितल्यास रात्रभरातील नकारात्मक उर्जेचा संचार आपल्याकडे आकर्षित होतो. त्यामुळे दिवसभर आपल्या वागण्याबोलण्यात नकारात्मकता दिसून येते. त्याचा संपूर्ण परिणाम आपल्या दिवसभराच्या कामावर होतो.
न धुतलेली भांडी- घरात सकारात्मक ऊर्जा राहावी यासाठी स्वयंपाक घर कायम स्वच्छ असणं गरजेचं आहे. भारतीय समाजात हा एक नियमच बनला आहे. पण सध्या धकाधकीच्या काळात भांड्यांच्या ढीग तसाच किचनमध्ये ठेवला जातो. त्यामुळे नकारात्मक उर्जेचा संचार होतो. त्यामुळे अशी भांडी पाहिल्यानंतर नकारात्मक विचार आपल्या घर करून दिवसभर राहातात.
आपली सावली पाहू नका- सकाळी उठल्या उठल्या आपली सावली पाहू नका. कारण असं केल्यास नकारात्मक उर्जा आपल्या भोवती वलय करते. त्याचा प्रभाव संपूर्ण दिवसभर आपल्याला दिसून येतो. दिवसभर तणाव,भीती, राग जाणवत राहतो. यासाठी बेडवरुन उठल्या उठल्या सावली पाहू नये.
बंद घड्याळ- वास्तुशास्त्रात बंद घड्याळाला कोणताच थारा नाही. कारण वास्तुतील बंद घड्याळ नकारात्मक उर्जेचं स्थान मानलं जातं. सकाळी उठल्या उठल्या बंद घड्याळाकडे आपली नजर गेली तर अशुभ मानलं जातं. त्यामुळे घरातील घड्याळ बंद पडणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच बंद तात्काळ दुरुस्त करावं किंवा घरातून बाहेर टाकावं.
सकाळी या गोष्टी केल्यास शुभ परिणाम दिसून येतात
सकाळी उठल्या उठल्या करदर्शन घेणं शुभ मानलं जातं. आपल्या हाताकडे बघून कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती । करमूले तु गोविन्दः प्रभाते करदर्शनम ॥ या मंत्राचा जप करावा. याशिवाय गायत्री मंत्राचा जाप केल्यास सकारात्मक उर्जेचा संचार होतो. डोळे उघडल्या उघडल्या देवाचं दर्शन झाल्यास दिवस चांगला जातो. त्याचबरोबर मोर पंख, फूल पाहिल्यास दिवस मस्त मजेत जातो. त्यामुळे सकाळी या गोष्टी पाहण्याकडे प्राधान्य देणं गरजेचं आहे.